पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यसभेतील मार्शलचा नवा गणवेश पाहिला का?

राज्यसभेतील मार्शलचा नवा गणवेश (फोटो - एएनआयवरून साभार)

राज्यसभेतील मार्शलच्या गणवेशामध्ये बदल करण्यात आला आहे. आता मार्शलना नव्या पद्धतीचा गणवेश देण्यात आला आहे. नव्या गणवेशात लष्करी आणि नागरी अशा दोन्हींचा मिलाफ आहे. त्याचबरोबर गणवेशाचा रंगही बदलण्यात आला आहे.

सरकारबद्दल भाजप-शिवसेनेला विचारा, शरद पवारांच्या वक्तव्याने खळबळ

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. राज्यसभेच्या २५० सत्रानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राज्यसभेत संबोधित केले. या पार्श्वभूमीवर मार्शलचे नवे गणवेश सर्व सदस्यांचे लक्ष वेधून घेत होते. 

चिदंबरम यांच्या जामीन याचिकेवर आता सुप्रीम कोर्टात सुनावणी

मार्शलसाठी आधी पांढऱ्या रंगाचा फेटा आणि सफारी अशा स्वरुपाचा गणवेश होता. त्यामध्ये पूर्णपणे नव्याने बदल करण्यात आला आहे. १९५२ मध्ये राज्यसभा अस्तित्त्वात आली. लोकसभा दर पाच वर्षांनी विसर्जित होते पण राज्यसभा पूर्णपणे कधीही विसर्जित होत नाही. दर दोन वर्षांनी राज्यसभेतील एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात आणि तेवढेच नव्याने निवडून येत असतात.

असा होता जुना गणवेश

राज्यसभेतील मार्शलचा जुना गणवेश (फोटो - एएनआयवरून साभार)