पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ब्रेकअप!, संसदेत आता विरोधी बाकावर बसणार शिवसेना

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यावरुन भाजपशी झालेल्या वादानंतर शिवसेना आता संसदेत विरोधी बाकावर बसणार आहे. 'एएनआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत आणि अनिल देसाई विरोधकांच्या बाकावर बसतील. त्याचबरोबर शिवसेनेचे १८ लोकसभा सदस्यही विरोधी पक्षातच बसतील, असेही बोलले जात आहे. आतापर्यंत हे सर्व खासदार सत्ताधाऱ्यांबरोबर बसत होते.

आमची बैठक व्यवस्था बदलण्यात आल्याची माहिती आम्हाला मिळाल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे. यावरही राऊत यांनी सरकार शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वातच स्थापन होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. परंतु, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत काहीच वक्तव्य केले नाही.

दिलासा!, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्यपालांकडून मदतीची घोषणा

शिवसेना आणि भाजपची युती तुटल्याची औपचारिक घोषणा झाली नसली तरी सध्याच्या घटनाक्रमावरुन शिवसेना एनडीएचा घटक पक्ष नसेल हे स्पष्ट होत आहे. रविवारी होणाऱ्या एनडीएच्या संसदीय दलाच्या बैठकीलाही शिवसेनेने जाण्यास नकार दिला आहे. रविवारी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आहे. सुमारे तीन दशकांपासून असलेल्या या युतीत महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदावरुन संघर्ष निर्माण झाला आहे.

'एक देश, एकाच दिवशी वेतन' व्यवस्था लवकरच देशात लागू

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:The seating arrangement of Shiv Sena MPs Sanjay Raut anil Anil Desai in the Parliament has changed they will sit in opposition now