पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशात कोरोनातून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८० %

लव अग्रवाल

इतर देशांच्या तुलनेत पहायला गेलं तर भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झालेल्यांचं प्रमाण हे ८० % आणि मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही त्या तुलनेत २०% आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे  सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आजच्या परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे. 

कोरोना लक्षणाची खात्री करण्यासाठी राज्यात कोविड हेल्पलाईन सुरू

जगाच्या पाठीवर इतर देश जे कोरोना विषाणूशी लढा देत आहे त्यांच्या तुलनेत आपल्या देशात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही जास्त आहे तर मृत्यूचं प्रमाण हे इतर देशांच्या तुलनेत  कमी आहे, असं त्यांनी परिषदेत सांगितलं. भारतात गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूची बाधा झालेले १ हजार ७ रुग्ण समोर आले आहेत तर २३ जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.

US ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेबाबतचा 'फैसला' जूनमध्ये होणार!

 देशांत रुग्णांची संख्या वाढत आहे, कारण आपण स्त्राव चाचण्यांची संख्या देखील वाढवत चाललो आहोत. १५ मार्च ते  ३१ मार्च या काळात रुग्णांची संख्या सरासरी २.१ नं वाढत होती मात्र आता १ एप्रिलपासून ही वाढ सरासरी १.२ वर आली आहे. याचाच अर्थ देशात  रुग्णांच्या संख्येतील वाढ ४० % नी घटली आहे अशी दिलासादायक माहिती त्यांनी दिली आहे. 

'IPL च्या यजमानपदासाठी श्रीलंकन बोर्डाकडून कोणताही प्रस्ताव नाही'

केरळ, उत्तराखंड, लदाख, हिमाचल प्रदेश, पाँडेचेरी, ओदीशा, आंध्र, दिल्ली, कर्नाटक, पंजाब, आसाम यांसारखी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यामध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत चाललेल्या प्रमाणात घट होत आहे याचाही उल्लेख त्यांनी केला आहे. कोरोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. देशात कोरोनावर लस शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत त्याचप्रमाणे पीपीई किट्स , व्हेंटिलेटर तयार करण्याचं कामही सुरु आहे असंही त्यांनी सांगितलं.