पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तुमच्यासारखे इतरांचेही हक्क आहेत, आंदोलकांशी मध्यस्थीचा प्रयत्न

आंदोलकांशी मध्यस्थीचा प्रयत्न

गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ शाहिन बाग परिसरात  सुधारित नागरिकत्त्व कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा करण्याकरता  सुप्रिम कोर्टानं मध्यस्थांची नेमणूक केली आहे.  आंदोलनकर्त्यांनी  आंदोलनाचे ठिकाण बदलावे यासाठी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न मध्यस्थांचा असणार आहे. 

संभाजी भिडेंना बेळगाव कोर्टाकडून जामीन मंजूर

आंदोलनकर्त्यांविरोधातील एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान सोमवारी कोर्टानं ज्येष्ठ वकील संजय हेगडे आणि साधना  रामचंद्रन यांची मध्यस्थ म्हणून नियुक्ती केली.  मध्यस्थांनी आंदोलनकर्त्यांशी  संवाद साधवा, अशी सूचना कोर्टाकडून करण्यात आली आहे. 
'तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे असं सुप्रिम कोर्टानंही सांगिलं आहे. सुधारित नागरिकत्त्व कायद्याला सुप्रिम कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. पण आपल्या प्रमाणे इतरांचेही काही हक्क आहे. यात रस्ता वापरणे, दुकानं सुरु करणे अशा हक्कांचाही समावेश आहे. तुमच्या हक्कांमुळे इतरांच्या हक्कांची पायमल्ली होता कामा नये', असं साधना रामचंद्रन  म्हणाल्या.

अट्टल साखळीचोरांवर MPDA अन्वये कारवाई शक्य, मुंबई हायकोर्ट

'आम्हाला तुमचं म्हणणं ऐकून घ्यायचं आहे, यातून तोडगा काढायचा आहे आणि मला खात्री आहे  यातून निघालेला मार्ग हा केवळ भारतासाठीच नाही तर जगासाठी  आदर्श उदाहरण ठरेल' असं म्हणत या प्रश्नावर सर्वांच्या सहकार्यानं तोडगा निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 
शाहिन बागेत गेल्या ५० हून अधिक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. यामुळे या परिसरातील वाहतूक वळवावी लागली आहे. या परिसरात मोठी वाहतूक कोंडी होते आहे. लोकशाही देशामध्ये आंदोलन करण्याचा नागरिकांना मूलभूत अधिकार आहे. पण आंदोलनासाठी सार्वजनिक वाहतुकीचा रस्ता रोखून धरणे योग्य नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले, त्यानंतर आंदोलकांशी चर्चा करण्याकरता मध्यस्थांची नेमणूक करण्यात आली. 

डोनाल्ड ट्रम्प भगवान राम आहेत का?; काँग्रेस नेत्याचा सवाल

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:The mediators talk to Shheen Bagh protesters and convince them to hold their agitation at alternative site