पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राम जन्मभूमीचा मुद्दा उपस्थित करत मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत अयोध्या प्रकरणातील ऐतिहासिक निकालाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. मतांच्या राजकारणासाठी काँग्रेसने राम जन्मभूमीच्या मुद्द्याकडे दुर्लक्षित केले. काँग्रेसने मनावर घेतले असते तर त्यांच्या काळातही ऐतिहासिक निकाल लागला असता. पण त्यांच्या जातीय राजकारणामुळे निकाल वर्षांनुवर्षे वाट रखडला होता, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर तोफ डागली. काँग्रेसची ही विचारसरणी देशासाठी घातक असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले. पलामू मतदार संघातील  प्रचारसभेत ते बोलत होते.  

'अजितदादा म्हणाले, भाजप-NCPचे सरकार बनणार आहे, तुम्ही या'

मोदी म्हणाले की, झारखंड आणि खास करुन पलामू हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. देशात कमळ फुलवण्यात येथील जनतेचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. येथील सर्वच समाजातील लोकांनी भाजपला पसंती दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही जनतेचा महाजनादेश भाजपसोबत असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

आता सुप्रीम कोर्टाचे उद्यापर्यंत 'वेट अँड वॉच'

ते पुढे म्हणाले की, मागील पाच वर्षांत भाजप सरकारने पाच कलमी कार्यक्रमातून झारखंडचा विकास करण्यावर भर दिला. भाजपने फक्त स्थिर सरकार दिले नाही तर स्थिरता, सुशासन, समृद्धी, सन्मान आणि सुरक्षा या पाच कलमी कार्यक्रमातून जनतेची सेवा केली. सरकारने विकासाचे नवे दरवाजेही उघडल्याचे मोदींनी सांगितले. वन संवर्धनाला कोणताही धक्का न लावता राज्यात रस्ते बांधणीची कामे पूर्ण करण्यात आली. रस्त्यांसोबत गावागावांमध्ये वीज पोहचवण्याचे काम झाले, असेही मोदींनी म्हटले आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:The matter of dispute over the birthplace of lord Ram was stalled by Congress Says PM Modi in jharkhand