पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शाहिन बागमध्ये गोळीबार; तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

शाहीन बागमध्ये गोळीबार

दिल्लीतील शाहिन बाग परिसरात गोळीबार झाल्याची  घटना समोर आली आहे. एका तरुणाने शाहिन बाग परिसरात गोळीबार केला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. दिल्लीचे डीसीपी चिन्मय बिस्वाल यांनी सांगितले की, तरुणाने हवेत गोळीबार केला. यामध्ये कोणी जखमी झाले नाही. पोलिसांनी तरुणाला ताबडतोब ताब्यात घेतले. 

Budget 2020 : ग्रामीण आणि शहरी भारताला जोडणारा अर्थसंकल्प

शाहिन बाग परिसरामध्ये गेल्या महिनाभरापासून नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीविरोधात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या ठिकाणीच एका तरुणाने गोळीबार केला. कपील गुज्जर असे गोळीबार करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो नोएडाच्या दल्लूपूरा येथे राहणारा आहे. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. 

'केंद्र सरकार शाहिन बाग आंदोलकांशी चर्चा करण्यास तयार'

दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात जामिया विद्यापीठ ते राजघाटापर्यंत गुरुवारी दुपारी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावेळी एका तरुणाने गोळीबार केला होता. या गोळीबारामध्ये जामिया विद्यापीठाचा विद्यार्थी जखमी झाला होता. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या तरुणाला अटक केली होती. शुक्रवारी त्याला दिल्लीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याची रवानगी १४ दिवसांच्या प्रतिबंधात्मक कोठडीमध्ये केली. 

Budget 2020 : काय स्वस्त, काय महाग?