पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा मोठा विजय, तर पाकची नाचक्की!

कुलभूषण जाधव प्रकरण

हेरगिरीच्या आरोपावरुन पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेकवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेवरील स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे. या निकामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा मोठा विजय झाला असून पाकिस्तानची पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे. साडेसहा वाजता आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली असून मुख्य न्यायाधिश अब्दुलकावी अहमद यूसुफ हे निकाल वाचून दाखवत आहेत.  

kulbhushan jadhav verdict live : फाशीच्या शिक्षेला स्थगिती कायम

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बुधवारी कुलभूषण जाधव प्रकरणात भारताची बाजू उचलून धरत कुलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेला दिलेली स्थगिती कायम ठेवली. या प्रकरणात पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले असल्याचे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने सांगितले. त्याचबरोबर कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधील न्यायालयातील सुनावणीवेळी भारताकडून दिली जाणारी राजनैतिक मदत मिळाली पाहिजे, यावरही न्यायालयाने शिक्कामोर्तब केला आहे. १५ विरुद्ध १ मताने न्यायालायने आपला निकाल दिला. १६ न्यायाधीशांमधील जे एक मत पाकिस्तानच्या बाजूने आहे ते पाकिस्तानच्या न्यायाधीशांचेच आहे.    

कुलभूषण जाधव यांच्या अटकेपासून IJC निकालापर्यंतच्या प्रमुख घडामोडी