पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपचा सामान्य कार्यकर्ता ते देशाचे गृहमंत्री, अमित शहांचा लक्षवेधक प्रवास

अमित शहा

भाजपला निवडणुकीत यश मिळवून देण्याचा फॉर्म्युला सापडलेले पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांना केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाचे खाते देण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्रीपदाची जबाबदारी अमित शहा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. आधीच्या सरकारमध्ये गृहमंत्रीपद सांभाळणारे राजनाथसिंह यांच्याकडे आता संरक्षणमंत्रीपद देण्यात आले आहे. अमित शहा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. गुजरातपासून ते नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहेत. 

भाजप अध्यक्षपदासाठी या दोघांची नावे चर्चेत

अमित शहा यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास लक्षवेधक आहे. २२ ऑक्टोबर १९६४ मध्ये त्यांचा मुंबईमध्ये जन्म झाला. त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचे टप्पे...

१. अमित शहा यांनी मेहसाणामध्ये प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर ते अहमदाबादमधून जैविक रसायनशास्त्र विषयातून पदवीधर झाले. 

२. अमित शहा यांच्या वडिलांचा प्लास्टिक पाईप निर्मितीचा व्यवसाय होता. शिक्षणानंतर त्यांनी वडिलांच्या व्यवसायात लक्ष घालण्यास सुरुवात केली. 

३. लहानपणापासूनच अमित शहा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले आहेत. महाविद्यालयीन जीवनात ते संघाचे स्वयंसेवक होते.

४. १९८२ मध्ये त्यांची नरेंद्र मोदी यांच्याशी पहिल्यांदा ओळख झाली. या ओळखीचे पुढे घट्ट मैत्रीत रुपांतर झाले.

५. १९८३ मध्ये त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली.

६. अमित शहा यांनी १९८६ मध्ये औपचारिकपणे भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. नरेंद्र मोदी यांच्या आधी एक वर्ष ते भाजपमध्ये आले.

७. १९८७ मध्ये ते भाजपच्या युवा मोर्चाचे सदस्य झाले.

८. १९९७ मध्ये सरखेज येथील पोटनिवडणुकीत अमित शहा यांना उमेदवारी द्यावी अशी शिफारस नरेंद्र मोदींनी केली.

९. त्यावेळी या पोटनिवडणुकीत अमित शहा विजयी झाले होते. त्यानंतर १९९८ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते याच मतदारसंघातून पुन्हा निवडून आले.

१०. १९९७ ते २०१२ मध्ये ते सरखेज विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. 

११. २००९ मध्ये अमित शहा गुजरात क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष झाले. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी या संघटनेचे अध्यक्षपद सोडल्यावर मग अमित शहा गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाले.

१२. २००३ ते २०१० या काळात त्यांनी गुजरात सरकारमध्ये गृह मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली.

१३. १९९१ मध्ये अमित शहा यांनी गांधीनगर लोकसभा मतदारसंघात लालकृष्ण अडवाणींचा प्रचार केला होता.

१४. १९९६ मध्ये त्यांनी याच ठिकाणी अटलबिहारी वाजपेयी यांच्यासाठीही प्रचार केला होता.

१५. अमित शहा यांनी आतापर्यंत ४२ छोट्या-मोठा निवडणुका लढविल्या आहेत. पण त्यापैकी एकाही निवडणुकीत त्यांनी पराभव पत्करलेला नाही.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:the emergence of amit anil chandra shah from a simple party worker to become the 30th home minister of india