पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

युरोपियन खासदारांच्या शिष्टमंडळाचा आज काश्मीर दौरा

 खासदारांच्या शिष्टमंडळाची आज काश्मीर भेट

कलम ३७० हटवल्यानंतर  पहिल्यांदाच यूरोपीय खासदारांचे शिष्टमंडळ भारतात आले आहे. २७ सदस्यांचं हे शिष्टमंडळ आज काश्मीरचा दौरा करणार आहेत.  

इक्बाल मिर्चीसंबधीत प्रकरणावरून शिल्पा शेट्टीच्या पतीला ईडीची नोटीस

केंद्र सरकारनं ५ ऑगस्टला काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांच हे शिष्टमंडळ भारतात  आलं आहे. युरोपियन खासदारांचे शिष्टमंडळ दोन दिवस श्रीनगरमध्ये राहणार आहे. येथे ते स्थानिक, पत्रकार आणि अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. त्याचप्रमाणे श्रीनगरमध्ये त्यांचा दौराही आयोजित करण्यात आला आहे. 

काश्मीर दौऱ्यापूर्वी यूरोपीयन खासदरांच्या या शिष्टमंडळानं सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. डोवाल यांनी ४० मिनिटे सदस्यांना काश्मीरच्या  सद्य परिस्थीची माहिती दिली. त्याचबरोबर सीमेपलीकडून पाकपुरस्कृत होत असलेल्या दहशवादी कारवाया याविषयीची माहिती देण्यात आली आहे.

 

बोअरवेलचा आणखी एक बळी, ७५ तासांचे प्रयत्न अयशस्वी

यूरोपीय खासदारांनी ११ वर्षांत पहिल्यांदा काश्मीर मुद्द्यावर चर्चा केली आणि जाहीररित्या भारताला पाठिंबा दिला. जम्मू-काश्मीरमधील भारत सरकारच्या मोठ्या निर्णयानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचा विरोध केला होता. अशावेळी यूरोपीय संघाचे बदलेले सकरात्मक परिणाम भारतासाठी मदतगार सिद्ध झाले.