पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

संसदीय अधिवेशनानंतर काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता

काँग्रेस अध्यक्ष पदाचा निर्णय लवकरच होणार

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी आपला राजीनामा दिला आहे. अनेक दिवस उलटूनही अध्यक्षपदाच्या निवडीबाबत रखडलेल्या प्रश्न सोडवण्यात येणार आहे. यासंबंधी पुढील आठवड्यात काँग्रेस कार्यकारणीची बैठक पार पडण्याची शक्यता आहे. या

बैठकीत कार्यकारी अध्यक्ष पदाची निवड आणि अध्यक्ष निवडीसंदर्भातील प्रक्रियेसंदर्भात घोषणा करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.   
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७५ व्या जयंती संदर्भातील कार्यक्रमाची आखणी करण्यासंदर्भात आज काँग्रेसने महासचिव आणि प्रभारी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.

अध्यक्षपदाच्या शर्यतीत ओढू नका : प्रियांका गांधी

त्यावेळी काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीसंदर्भात  रणदीप सुरजेवाला म्हणाले की, संसदीय अधिवेशन संपल्यानंतर कार्यकारणीची बैठक होण्याची शक्यता आहे. मात्र, यासंदर्भातील तारीख आणि रुपरेषा काय असेल याबाबत सध्या काहीच सांगता येणार नाही. या बैठकीला राहुल गांधी देखील उपस्थित असतील, असे ते म्हणाले. काँग्रेस पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने ८ ऑगस्टला काँग्रेस कार्यकारणीची बैठक पार पडण्याची शक्यता बोलून दाखवली.  

आमचे काम गेल्या सरकारच्या दुप्पट, महाजनादेश यात्रेचा