पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गेल्या काही दिवसांपासून आगीनं धुमसत असलेल्या अ‍ॅमेझॉनच्या जंगलाविषयी या गोष्टी माहितीये?

अ‍ॅमेझॉनचं जंगल

अ‍ॅमेझॉनचं  वर्षावन हे  इथल्या जैवविविधता आणि अनेक रहस्यांनी भरलं आहे. जगातील सर्वांत मोठं आणि तितकंच गू़ढ हे वर्षावन आहे. हे  निसर्गसंपन्न असं जंगल गेल्या काही दिवसांपासून आगीनं धुमसतंय. जगाच्या एका कोपऱ्यात आगीनं धुमसत असलेल्या या वर्षावनाविषयी काळजी करण्याची आता वेळ आली आहे. कारण हे जंगल माणसांसाठी तितकंच महत्त्वाचं आहे.

- गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत ३९, ७५९ आगीच्या घटनांची नोंद इथे झाली होती. मात्र  २०१९ मध्ये ऑगस्ट पर्यंत ७५ हजार घटनांची नोंद झाली असल्याचं नॅशनल इन्स्टिट्यूड  फॉर स्पेस रिसर्चनं म्हटलं आहे, वाढती वृक्षतोड, मानवाकडून जाणीवपूर्वक लावली जाणारी आग, आणि वणवा ही आगीची प्रमुख कारणं आहेत. 

प्रियांकाला सदिच्छा दूत पदावरून हटवण्याची पाकची मागणी युनिसेफनं फेटाळली

-  या जंगलाचा विस्तार नऊ देशांत परसला आहे. लॅटिन अमेरिकेचा जवळपास ४० टक्के भाग या जंगलानं व्यापला आहे. अ‍ॅमेझॉनचं खोर हे सात दक्षलक्ष किलोमीटर परसलं आहे यातला  ५.५ दक्षलक्ष किलोमीटर भाग हा वर्षावनांनी व्यापला आहे. यावरून या जंगलाच्या विस्ताराची आपण कल्पना करू शकतो. 

- या वर्षावनाचा सर्वाधिक भाग हा बाझील देशात आहे त्यानंतर  पेरू, कोलंबिया, व्हेनेझ्युएला, इक्वेडोअर, बोलिविया  सुरूनेम, फ्रेंच गयाना, ग्युआना या नऊ देशांत या वर्षावनाचा भाग आहे.
- जगातील सर्वात दुर्मिळ अशा प्रजाती या वर्षावनांत आढळतात. 
- जगातील पाव टक्के  प्राणी, वनस्पती, मासे, पक्ष्यांच्या प्रजाती या अ‍ॅमेझॉनच्या जंगलात आढळतात. 

तेल कंपन्यांनी एअर इंडियाचा इंधन पुरवठा रोखला

- या जंगलात ३० हजार प्रकारच्या वनस्पती, २,५०० प्रकारचे मासे, १५०० पक्ष्यांच्या प्रजाती,  ५०० सस्तन प्राण्याच्या प्रजाती, अडीच लाख कीटकांच्या प्रजाती आढळतात अशी अ‍ॅमेझॉन कॉपरेशन ट्रिटी ऑर्गनायझेशनची आकडेवारी सांगते.
- गेल्या २० वर्षांत २,२०० नव्या वनस्पतींच्या प्रजातींचा शोध इथे लागला आहे.
- जैवविविधतेबरोबरच या जंगलात सोने, तांबे,  लोह यांसारखी  खनिजंही आढळतात.