पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... यापेक्षा आणीबाणी बरी, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश उद्विग्न

दिल्लीतील हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे

दिल्लीतील धुरक्याच्या आणि हवेतील वाढत्या प्रदूषणाच्या मुद्द्यावरून सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले. विविध सरकारी संस्था आपले काम योग्य पद्धतीने करीत नाहीत. त्यामुळे सामान्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. ही परिस्थिती आणीबाणीपेक्षा वाईट असल्याचे मत खंडपीठातील एक न्यायाधीश अरूण मिश्रा यांनी नोंदविले. ती आणीबाणी यापेक्षा बरी होती, असे त्यांनी म्हटले.

ICC T20 WC: नव्या पद्धतीने रंगणार सामने, संपूर्ण माहिती एका क्लिकवर

दिल्ली आणि उत्तर भारतात अनेक ठिकाणी हवेतील प्रदूषण धोक्याची पातळी ओलांडून वर गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील परिस्थिती जैसे थे आहे. दिल्ली सरकारने आजपासून खासगी गाड्यांसाठी सम-विषम योजना लागू केली आहे. दिल्लीतील गाड्यांमधून होणारे प्रदूषण आणि आजूबाजूच्या राज्यांमध्ये पराली अर्थात धसकटं जाळली जातात. त्यामुळे दिल्लीच्या हवामानावर त्याचा गंभीर परिणाम होतो. 

आजूबाजूच्या राज्यांमध्ये हिवाळा सुरू झाला की धसकटं जाळली जातात. यावर बंदी असतानाही ते केले जात असल्याने त्याचा परिणाम दिल्लीच्या हवेवर होतो. त्यामुळे या प्रकरणी सर्व संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना जबाबदार धरले गेले पाहिजे, अशी मागणी पर्यावरण संवर्धन आणि नियंत्रण प्राधिकरणाचे अध्यक्ष भुरे लाल यांनी न्यायालयात केली. या प्रकरणी तज्ज्ञ म्हणून त्यांना न्यायालयात पाचारण करण्यात आले होते.

यंदाच्या वर्षी हरियाणामध्ये धसकटं जाळण्यावर नियंत्रण आणण्यात आले. पण पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात धसकटं जाळली गेली, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने आता या राज्यांच्या मुख्य सचिवांना निमंत्रित करण्याशिवाय पर्याय नसल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर संबंधित ठिकाणच्या पोलिसांना आणि पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेशही द्यावे लागतील, असे न्यायालयाने म्हटले.

शिवसेना नेते संजय राऊतांनी घेतली राज्यपालांची भेट

न्या. अरूण मिश्रा म्हणाले, शेतकरी काय करताहेत. त्याचा काय परिणाम होतो हे त्यांना चांगले माहिती आहे. त्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल अजिबात दयामाया नाही. न्यायालयाने केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारलाही फटकारले.