पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नरेंद्र मोदींची भेट अनोखा अनुभव - अभिजित बॅनर्जी

अभिजित बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेली भेट एक अनोखा अनुभव होता, अशा शब्दांत नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच अभिजित बॅनर्जी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

नोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...

ते म्हणाले, सर्वसाधारणपणे धोरणांबद्दल आपण ऐकतो. पण ते धोरण तयार करण्यामागे काय विचार होता, याबद्दल क्वचितच ऐकायला मिळते. नरेंद्र मोदींनी ते प्रशासनाकडे कशा पद्धतीने बघतात, लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास उडण्यामागे काय कारणे असतात, ही व्यवस्था नंतर काही मूठभर लोकांच्या हातात कशी सापडते, याबद्दल सविस्तर विवेचन केले. प्रशासनात आपण कशा पद्धतीने सुधारणा करीत आहोत. जेणे करून प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी अधिकाधिक उत्तरदायी होतील, याबद्दल त्यांनी माहिती दिली. 

राज्यसभेत NDAची स्थिती आणखी मजबूत, काँग्रेसचे नेते भाजपत

भारतामध्ये प्रतिसादात्मक प्रशासनाची सध्या सर्वात जास्त निकड आहे. जमिनीवरील वास्तवाशी जोडले गेलेले प्रशासन देशासाठी जास्त उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीसाठी नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या व्यग्र दिनचर्येतून खूप वेळ दिला. त्यासाठी त्यांनी पंतप्रधानांचे आभारही मानले आहेत.