पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तिहार तुरुंगातून चिदंबरम यांची ट्विटच्या माध्यमातून सरकारवर टीका

पी चिदंबरम

आयएनएक्स मीडिया प्रकरणात सध्या तिहार तुरुंगात असलेल्या माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी बुधवारी ट्विटरच्या माध्यमातून केंद्र सरकारवर टीका केली. देशातील आर्थिक मंदीला तोंड देण्यासाठी सरकारने काय नियोजन केले आहे, असा प्रश्न पी चिदंबरम यांनी आपल्या कुटुंबियांच्या माध्यमातून उपस्थित केला. त्यांनी म्हटले आहे की, अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीबद्दल मला तीव्र चिंता वाटते. यामुळे गरिबांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. उत्पन्न घटले, नोकऱ्या गेल्या, व्यापार मंदावला, गुंतवणूकही कमी झाली या सगळ्याचा फटका गरीब आणि मध्यम वर्गाला बसला आहे. या सगळ्यातून देशाला बाहेर काढण्यासाठी सरकारचे नियोजन कुठे आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. चिंदबरम यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून हे ट्विट केले आहे. गेल्या काही दिवसांत अनेक जण आपल्या पाठिशी उभे राहिले. त्याबद्दलही चिदंबरम यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

मागण्या मान्य न झाल्यामुळे उदयनराजे यांचा भाजप प्रवेश बारगळला

आयएनएक्स मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची रवानगी सध्या तिहार तुरुंगात करण्यात आली आहे. तत्पूर्वी १५ दिवस सीबीआय कोठडीत काढल्यानंतर त्यांची जामिनासाठीची याचिका न्यायालयाने फेटाळली होती.

आपल्याविरुद्ध करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून खुलासा केला. त्याचबरोबर मंदीच्या परिस्थितीवरून सरकारवर टीका केली. आपले सर्व ट्विट हे कुटुंबियांकडून प्रसिद्ध केले जात आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

Amazon च्या नव्या ऑफिसात ४९ लिफ्ट्स, झुम्बा क्लासेस; तरीही...

जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत विकासदर ५ टक्क्यांपर्यंत खाली येण्यावरूनही चिदंबरम यांनी सरकारवर टीका केली होती. उपरोधिकपणे पाच टक्के म्हणजे काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.