पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... म्हणून पाकने LOC जवळचे दहशतवादी मागे नेले आणि काही दिवसांनी परत धाडले

नियंत्रण रेषेजवळ भारतीय जवान गस्त घालताना

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या बाजूला असलेल्या दहशतवादी तळांवरून सर्व दहशतवाद्यांना हलविण्यात आले होते. पाकिस्तान आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या प्रमुखांच्या भेटीवेळी नियंत्रण रेषेवर कोणतीही दहशतवादी कारवाई व्हायला नको म्हणून त्या देशाने हा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे या भेटीनंतर आता पुन्हा एकदा नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या बाजूला दहशतवादी त्यांच्या तळांवर परतल्याचे दिसते आहे. गुप्तचर यंत्रणांचा अहवाल आणि उपग्रहांकडून मिळालेल्या छायाचित्रांच्या माध्यमातून ही माहिती पुढे आली आहे.

ज्यांनी मोदीची साथ सोडली त्याचा सत्यानाश झालाः मुख्यमंत्री फडणवीस

भारतीय लष्करामध्ये गुप्तचर यंत्रणांच्या अहवालाचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या बाजूने भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यासाठी दहशतवादी प्रयत्न करीत नसल्याचे अहवाल गुप्तचर यंत्रणांकडून आम्हाला मिळाले. आम्हाला त्याचे आश्चर्य वाटले कारण की मे ते ऑक्टोबर याच काळात पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचे प्रयत्न केले जातात. 

गेल्या महिन्यात इम्रान खान आपल्या देशाच्या शिष्टमंडळासह अमेरिकेला गेले होते. २२ जुलै रोजी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल कमार बाजवा, आयएसआयचे प्रमुख फैज हमीद होते. दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरिय बैठक होत असताना इकडे सीमेवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी कोणतीही गडबड करू नये, यासाठी सर्व दहशतवाद्यांना तळांवरून मागे नेण्यात आले होते, अशी माहिती मिळाली आहे.

काश्मीरप्रश्नी चर्चेसाठी भारताला तयार करा, पाकची अमेरिकेला विनंती

त्याचवेळी ताज्या अहवालानुसार पाकिस्तानच्या बाजूने सध्या २०० ते २५० दहशतवादी सीमेवरून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. गेल्या मंगळवारी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय जवानांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करता यावी, यासाठीच हा गोळीबार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. गुरेज सेक्टरमध्ये हा गोळीबार करण्यात आला होता.