पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

श्रीनगरमधील चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. श्रीनगरच्या परिम पोरा भागामध्ये ही घटना घडली. दहशतवाद्यांच्या गोळीबारानंतर झालेल्या चकमकीत सीआरपीएफ जवानांना दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले तर एक दहशतवादी जखमी झाला आहे. या चकमकीत एक जवान शहीद झाला.

मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगितीस सुप्रीम कोर्टाचा नकार

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराचे ऑपरेशन सुरु आहे. बुधवारी श्रीनगरमधील परिम पोरा भागामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जवानांनी घटनास्थळी धाव घेत सर्च ऑपरेशन सुरु केले. जवानांनी परिसराला घेराव घातला. त्याचवेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले तर एक दहशतवादी जखमी झाला आहे. त्याला जवानांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरुन मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. 

महाराष्ट्रात सिंगल युज प्लॅस्टिकवर एक मेपासून बंदी

दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या सीमा भागांमध्ये पाकिस्तानी सैन्य भारताच्या दिशेने गोळीबार करत आहे. मंगळवारी पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या पूंछ सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. तसंच, याआधी सोमवारी रात्री जम्मू-काश्मीरच्या कुपवाडातील तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यांनी गोळीबार केला. यामध्ये एका नागरिकाचा मृत्यू तर चार जण जखमी झाले होते. 

...म्हणून पहिलं वहिलं शतक अय्यरसह संघासाठीही 'स्पेशल'