दहशतवाद्यांनी मंगळवारी पुलवामामधील द्रबगाम येथील एका शाळेजवळ तैनात असलेल्या सीआरपीएफच्या जवानांवर गोळीबार केला. 'एएनआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, शाळेत परीक्षा सुरु होती. तिथे द्रबगाममध्ये तैनात जवानांवर अज्ञात हल्लेखोरांनी सहा ते सात राऊंड गोळीबार केला. दरम्यान या हल्ल्यात कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही.
न्या. शरद बोबडे यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती, १८ नोव्हेंबर पदभार स्वीकारणार
#UPDATE: Additional forces have been deployed at the spot. A search operation has been launched. #JammuAndKashmir https://t.co/dRm6b5neW2
— ANI (@ANI) October 29, 2019
दुपारी तीनच्या सुमारास हा हल्ला झाला. सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिस शाळेत तैनात करण्यात आले होते. दहशतवाद्यांकडून गोळीबार झाल्यानंतर परिसराला घेरण्यात आले असून शोध मोहीम सुरु आहे. यूरोपीयन खासदारांचे शिष्टमंडळ काश्मीरचा आढावा घेण्यासाठी आले असतानाच हा हल्ला झाला आहे.
काँग्रेसकडून 'या' स्वातंत्र्य सैनिकांना भारतरत्न देण्याची मागणी
तत्पूर्वी, सोमवारी दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरमधील बिजबेहरामध्ये एका ट्रक चालकावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली होती. तर दुसऱ्या एका घटनेत काश्मीरमधील सोपोर येथे सोमवारी सांयकाळी बस स्थानकाजवळ ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. यात १९ लोक जखमी झाले होते.