पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून पोस्टरबाजी

काश्मीर खोऱ्यात तणावाचे वातावरण

जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर अद्यापही या प्रदेशात तणावपूर्ण वातावर पाहायला मिळत आहे. काश्मीर खोऱ्यातील जनतेमध्ये दहशतवादी भय निर्माण करण्याचे प्रयत्न करत असल्याचे समोर येत आहे. दहशतवाद्यांकडून रात्रीच्या वेळेस दुकानांना सिल करणे तसेच फलकबाजीच्या माध्यमातून धमकी दिली जात आहे.  

मोदींच्या विमानाला हवाई हद्द वापरण्यास पाकची मनाई

जम्मू काश्मीर पोलिसांनी या मुद्यावर मौन धारण केले आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने जम्मू काश्मीरमध्ये दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती दिली आहे. दक्षिण कश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील मोदरीगाम गानाक दुकानांना  टेप चिटकवून सील करणे आणि हिज्बुल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेच्या फलकबाजीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

...म्हणून आता विक्रम लँडरशी संपर्क होण्याची आस धूसर

अधिकाऱ्यांने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार ही परिस्थिती फक्त एका गावापुरती मर्यादीत नाही. तर  श्रीनगरमधील करण नगर बाजार परिसरातील दुकानांच्या शटरवर 'एलडब्ल्यू' असे मोठ्या अक्षरात लिहून हिज्बुल मुजाहिद्दीनचे चिन्ह दर्शवण्यात आले आहे. दुकान मालकांनी दहशतवाद्यांचे म्हणने एकले नसल्याने त्यांना अखेरचा इशारा दहशतवादी देण्याचा प्रयत्न करत असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.