पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

घुसखोरीसाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये शेकडो दहशतवादी दाखल

भारतीय लष्कर

कलम ३७० हटवल्यानंतर सीमापलीकडील दहशतवादी काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. नियंत्रण रेषेजवळ पाक व्याप्त काश्मीरमधील (पीओके) शिबिरांमध्ये शेकडो दहशतवादी दाखल झाले आहेत. पाकिस्तानी सैन्यदल या दहशतवाद्यांना भारतात घुसवण्याच्या संधीच्या शोधात आहे. 

J&K : राज्यपाल म्हणाले, राहुल गांधींसाठी खास विमान पाठवतो

गोपनीय माहितीनुसार, गेल्या एक आठवड्यात पीओकेस्थित दहशतवादी शिबिरांमध्ये हालचाली वाढल्या आहेत. येथे मोठ्याप्रमाणीवर दहशतवादी एकत्र आल्याचा अंदाज आहे. त्यांना पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराआड नियंत्रण रेषा पार करुन देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

पूर्वी नियंत्रण रेषेच्या ज्या ठिकाणांवरुन कधीच अशाप्रकारच्या संशयित हालचाली झाल्या नव्हत्या. त्या ठिकाणांवरुनही घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षादलांच्या अभियानामुळे यावेळी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. आता काश्मीर खोऱ्यात सुमारे ५५-६० दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती मिळाली आहे.

वाढदिवसाचा व्हिडिओ टिकटॉकवर टाकणे पडले महागात; तरुण अटकेत

भारतीय लष्कराची करडी नजर

भारतीय सेना सीमेपार होत असलेल्या हालचालींवर सातत्याने नजर ठेऊन आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय सैन्याने पाकच्या 'बॅट'च्या दहशतवाद्यांचा घुसखोरी करण्याचा डाव हाणून पाडला होता. त्याचबरोबर भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेवरील काही दहशतवादी तळही रणगाडे आणि गोळीबारात नष्ट केले होते.