पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

J&K मधील बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवादी हल्ला, CRPF चे ३ जवान शहीद

जम्मू काश्मीरमध्ये मागील चोविस तासांतील हा दुसरा हल्ला आहे. (संग्रहित छायाचित्र)

जम्मू-काश्मीर येथील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे शनिवार सायंकाळच्या दरम्यान दहशतवादी हल्ला झाल्याचे वृत्त आहे. पोलिस दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) संयुक्त तुकडीवर झालेल्या या हल्ल्यात  सीआरपीएफचे ३  जवान शहीद झाले आहेत. शुक्रवार रात्रीपासून जम्मू काश्मीर खोऱ्यातील हा दुसरा हल्ला आहे.  शुक्रवारी जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील नीवा परिसरात  सीआरपीएफच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला झाला होता. यात एक जवान जखमी झाला होता. सीआरपीएफने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी नेवा येथील सीआरपीएफच्या १८३ बटालियनच्या जवानांवर बेछुड गोळीबार केला होता.   

IMF ने पाकला दिलेल्या १.४ अब्ज डॉलर मदतीच्या निर्णयावर भारताची नाराजी

आठवड्याभरापूर्वी जम्मू काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात विशेष पोलिस अधिकाऱ्याची हत्या करुन त्यांच्या सहकाऱ्याला गंभीर जखमी करण्यात आले होता. या प्रकरणातील दोन दहशतवाद्यांचा शुक्रवारी खात्मा करण्यात आला होता.  जम्मू पोलिस अधिकाऱ्यांनी या वृत्ताची पुष्टी देखील केली होती.  सध्याच्या घडीला जगभरात कोरोना विषाणूचे संकट घोंगावत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेत पाककडून काही दहशतवादी संघटना भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्नात असल्याची माहितीही भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. 

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजारांची आर्थिक मदत

१४ फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणात शुक्रवारी दोघांना राष्ट्रीय तपास यंत्रणेन (एनआयए) अटक केली होती. यातील एकावर आयईडी तयार करण्यासाठी रसायनांची ऑनलाइन खरेदी केल्याचा आरोप आहे. यांच्या अटकेनंतर शनिवारी सीआरपीएफच्या तुकडीवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात नेमका कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात आहे हे अद्याप समोर आलेले नाही.