पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दहशतवाद हाच सर्वात मोठा धोका - मोदी

नरेंद्र मोदी

दहशतवाद ही जगापुढील सर्वात मोठी समस्या आहे. यामुळे निष्पाप लोक मारले जातात पण त्याचवेळी आर्थिक विकास आणि सामाजिक स्थिरता यालाही धक्का बसतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

जी २० शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर जपानमध्ये ब्रिक्स राष्ट्र समूहातील प्रमुखांची एक अनौपचारिक बैठक शुक्रवारी सकाळी झाली. त्यावेळी आपली भूमिका मांडताना नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला आहे. 

नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा

नरेंद्र मोदी म्हणाले, दहशतवादामुळे मानवी समूहाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे निष्पाप लोक मारले जातात. पण त्याचवेळी देशाच्या आर्थिक विकासाला आणि सामाजिक स्थिरतेला धक्का बसतो. 

आपल्या भाषणाच्या सुरुवातीला नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलचे नवे राष्ट्राध्यक्ष जेअर बोलसोनारो यांचे अभिनंदन केले आणि त्यांचे ब्रिक्स समुहात स्वागत केले. आपल्या भाषणात त्यांनी जागतिक व्यापार संघटना मजबूत करण्यावर, ऊर्जा साधनांच्या सुरक्षिततेवर आणि दहशतवादावर एकत्रितपणे मात करण्यावर मत मांडले. जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीवरही त्यांनी चिंता व्यक्त केली.