पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दोषींना परत पाठवण्याचे यमराजाला आदेश द्या, हायकोर्टात अजब मागणी

कोलकाता उच्च न्यायालय

खुनाच्या गुन्ह्यातील मृत पावलेल्या दोन दोषींना धरतीवर परत पाठविण्याचे आदेश कलकत्ता उच्च न्यायालयाने द्यावेत, अशी एक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या दोषींच्या नातेवाईकांनी ही याचिका दाखल केली आहे. दोषींना आपली शिक्षा कारागृहात पूर्ण करता यावी, यासाठी त्यांना परत धरतीवर पाठवावे, असे आदेश न्यायालयाने द्यावेत, असे या याचिकेत म्हटले आहे. जर यमराजाने ऐकले नाही तर त्याच्याविरोधात अवमान याचिका चालविण्यात यावी, अशीही अजब मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

आरे कॉलनीत मध्यरात्री राडा, झाडे तोडण्यावरून आंदोलक संतप्त

अलीपूरमधील सत्र न्यायालयाने १९८४ च्या एका गुन्हेगारी खटल्यात समर आणि प्रदीप चौधरी नावाच्या दोन युवकांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. कलकत्ता उच्च न्यायालयाने जून २०१६ मध्ये सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवला होता. पण या प्रकरणात प्रदीप याचा १९९३ मध्ये तर समर याचा २०१० मध्ये मृत्यू झाला आहे. या दोन्ही दोषींच्या नातेवाईकांनी मुख्य न्यायाधीश टीबीएन राधाकृष्णन यांच्याकडे जून २०१६ मधील न्यायालयाचा निकाल मागे घेण्याची मागणी केली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकही FIR नाही

समर यांचा मुलगा अशोक आणि प्रदीप यांची पत्नी रेणू यांनी जर निकाल कायम ठेवायचा असेल तर उच्च न्यायालयाने आपला निकाल यमराजाला पाठवला पाहिजे आणि दोन्ही दोषींना त्यांची शिक्षा भोगण्यासाठी धरतीवर परत पाठविण्याचे आदेश दिले पाहिजेत.