पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तेलंगणात महिला तहसीलदारास जिवंत जाळले

मृत महिला तहसीलदार विजया रेड्डी

तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात सोमवारी महिला तहसीलदाराला जिवंत जाळण्याचा खळबळजनक प्रकार घडला. विजया रेड्डी असे मृत महिला तहसीलदाराचे नाव आहे. एका व्यक्तीने त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले. यात विजया यांचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना रंगारेड्डी जिल्ह्यातील अब्दुल्लापूरमेट येथे घडली. यात संशयित आरोपीही जखमी झाला आहे.

'माझा आमदार, माझा मुख्यमंत्री', 'मातोश्री' बाहेर पोस्टरबाजी

तहसीलदार विजया रेड्डी यांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोन कर्मचारीही जखमी झाले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतरही जमिनीच्या कागदपत्रात आवश्यक दुरुस्ती न केल्याने नाराज असलेल्या सुरेश मुदिराजू याने हे कृत्य केले. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी जेवणाच्या वेळी सुमारे दीड वाजता सुरेश जमिनीची कागदपत्रे घेऊन कार्यालयात आला. तो थेट तहसीलदार विजया यांच्या दालनात गेला. तिथे झालेल्या वादानंतर त्याने विजया यांच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावली. त्यावेळी दालनात विजया एकट्याच होत्या.

RCEP मध्ये सहभागी न होण्याचा भारताचा निर्णय - सूत्र

विजया यांच्या आरडाओरडीनंतर कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी त्यांचा दालनाकडे धाव घेतली. त्यांनी विजया यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यात दोन कर्मचारीही जखमी झाले. तहसीलदार विजया यांना पेटवत असताना संशयित आरोपी सुरेश हाही ५० ते ६० टक्के भाजल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Video : संघ हरला, पण कार्तिकनं तमाम क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली