पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'गायब' का होतो याचे कारण तेजस्वी यादव यांनी केले स्पष्ट

तेजस्वी यादव

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर 'गायब' झालेले बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी शनिवारी ट्विटरच्या माध्यमातून आपल्याबद्दल माहिती दिली. उपचार सुरू असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मी सार्वजनिक जीवनापासून दूर होतो, असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. 

बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेले तेजस्वी यादव पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीही सभागृहात दिसले नाहीत. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर ते कुठल्याच कार्यक्रमात दिसले नव्हते. निवडणुकीनंतर तेजस्वी यादव एकदम कुठे गेले, याची चर्चा बिहारच्या राजकीय वर्तुळात रंगली होती.

ट्विटमध्ये तेजस्वी यादव यांनी लिहिले आहे की, मित्रांनो, गेल्या काही आठवड्यांपासून माझ्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. पण काही विरोधकांनी आणि माध्यमांनी माझ्याबद्दल रंजक कथा तयार करून त्या लोकांपर्यंत पाठवल्याचे बघून मला आश्चर्य वाटले.

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर २९ मेपासून तेजस्वी यादव सार्वजनिक ठिकाणी कुठेही दिसले नाहीत. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी २९ मे रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला ते उपस्थित होते. त्यानंतर ते गायब झाले होते. बैठकीनंतर ते 'गायब' झाले होते.