पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'तेजस्वी यादव यांनी सरकारी बंगल्यात लावले होते ४४ एसी'

तेजस्वी यादव

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या पूर्वीच्या सरकारी बंगल्याचा नुतनीकरणावरुन आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु आहेत. बिहार सरकारच्या बांधकाम विभागाचे प्रधान सचिव चंचल कुमार यांनी बंगल्याच्या नुतनीकरणासाठी जास्त खर्च आला नसल्याचा दावा केल्यानंतर आता विद्यमान उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी तेजस्वी यांच्या कार्यकाळात बंगल्यावर भरमसाठ खर्च केल्याचा आरोप केला आहे.

'राहुल यांनी राजीनामा दिल्यास ती राजकीय आत्महत्या ठरेल'

कोणत्या नियमाअंतर्गत तेजस्वी यादव यांनी ५ देशरत्न मार्गावरील बंगल्यात ५९ लाख रुपयांचे फर्निचर केले. त्याचबरोबर नुतनीकरणासाठी कोट्यवधीं रुपयांचा खर्च केले. या बंगल्यात ४४ एसीही कोणत्या नियमानुसार बसवल्याचा प्रश्न मोदी यांनी उपस्थितीत केला आहे. 

मोदी पुढे म्हणाले की, काही एसी हे बाथरुममध्येही लावण्यात आले. ३५ महागड्या चामड्याने बनवलेले सोफासेट, ४६४ फॅन्सी एलईडी लाइट, १०८ पंखे, बिलबोर्ड टेबल, भिंतींवर वुडन पॅनल, वुडन फ्लोर आणि परदेशातून मागवण्यात आलेले ग्रॅनाईट बंगल्यात लावण्यात आले आहेत. तेजस्वी यादव यांनी सरकारी पैशांचा गैरवापर केला नाही का ? जर तेजस्वी यादव यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग आणि बंगल्यावर वायफळ खर्च केला नसता तर सर्वोच्च न्यायालयात त्यांच्यावर ५० हजारांचा दंड लावून बंगला रिकामा करावा लागला नसता. 

लोकांना घराणेशाही नको आहे, तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्याची मागणी

राज्य सरकारने तेजस्वी यांना कोणतीही क्लीन चिट दिलेली नाही, हेही मोदी यांनी स्पष्ट केले. आरजेडी, काँग्रेस आणि जेडीयू आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर तेजस्वी यांना उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सरकारी बंगला देण्यात आला होता. 

त्यानंतर जेडीयू-भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर सुशीलकुमार मोदी यांनी तेजस्वी यांच्याकडून बंगला रिकामा खाली करुन घेतला होता. सरकारच्या या निर्णयाविरोधात तेजस्वी यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. पण तिथे त्यांच्या हाती निराशा आली होती. त्यांना नंतर बंगला रिकामा करावा लागला होता.

 

बिहारमध्ये लालूंच्या पक्षाची अवस्था बिकट, सगळेच उमेदवार हारले

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Tejashwi Yadav install 44 acs in government allotted bungalow says bihar deputy cm sushil kumar modi