पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तेजस एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या चाळ्यांनी हॉस्टेस वैतागल्या, कडक उपायांचा विचार

तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस

देशातील पहिलीवहिली खासगी तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांनी कसे वागले पाहिजे, याचे धडे त्यांना देण्यात येणार आहेत. काही उचापतखोर आणि मस्तवाल प्रवाशांच्या चाळ्यांमुळे आयआरसीटीसीपुढे सध्या अडचण निर्माण झाली आहे. या प्रवाशांच्या बेशिस्त वर्तनाचा परिणाम या रेल्वेच्या सेवेवरही झाला आहे. सध्या ट्रेन हॉस्टेसकडून फिडबॅक घेतला जातो आहे. तो आल्यानंतर अशा प्रवाशांच्या उचापतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही कडक नियम करण्यात येतील. 

भारतीय संघाने रचला इतिहास; द. अफ्रिकेचा २०२ धावांनी पराभव

सध्या दिल्ली ते लखनऊ या शहरांमध्ये धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये एखाद्या विमानात देण्यात येतात तशा सर्व सुविधा दिल्या जातात. त्यासाठी या गाडीत ट्रेन हॉस्टेसही तैनात करण्यात आल्या आहेत. पण गाडीतून प्रवास करणारे काही प्रवासी या ट्रेन हॉस्टेसशी चुकीचे वर्तन करतात. त्यामुळे त्यांना कसे रोखायचे हा मोठा प्रश्न आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये प्रवाशांना खानपान सेवा देताना काही प्रवासी या ट्रेन हॉस्टेससोबत त्यांची परवानगी न घेता सेल्फी काढतात. काही महाभाग तर इतके सरावले आहेत की त्यांनी थेट या ट्रेन हॉस्टेसकडे त्यांचा मोबाईल नंबरही मागितला. या ट्रेन हॉस्टेस गाडी सुरू असताना आपले काम करतात. त्यावेळी काही प्रवासी त्यांचे व्हिडिओ शूट करतात. काही लोक तर सतत सीटजवळील बटण दाबून या हॉस्टेसना बोलावतात आणि त्यांना त्रास देतात. 

रुग्णवाहिकेअभावी मराठी अभिनेत्रीचा प्रसूतीनंतर मृत्यू

हे सगळे घडल्यानंतर आता या गाडीमध्ये होणाऱ्या उदघोषणेत बदल करण्यात आले आहेत. सातत्याने ट्रेन हॉस्टेसशी सभ्यतेने वागण्याची सूचना प्रवाशांना करण्यात येत आहे. त्याचबरोबर हॉस्टेससोबत सेल्फी काढू नका. सीटजवळचे बटण सारखे दाबू नका, असेही आवाहन प्रवाशांना केले जात आहे. आयआरसीटीसीचे पाच अधिकारी गाडीमध्ये प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. या गाडीत एकूण २८ ट्रेन हॉस्टेस आहेत. त्यांच्याकडून रोजच्या रोज त्यांना आलेल्या अनुभवांचा फिडबॅक घेतला जाणार आहे.