पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बहिणीबरोबर टिकटॉक व्हिडिओ केला म्हणून निर्वस्त्र करुन मारहाण

बहिणीबरोबर टिकटॉक व्हिडिओ केला म्हणून निर्वस्त्र करुन मारहाण

जयपूरमध्ये एका युवकाला विवस्त्र करुन रस्त्यावर धिंड काढल्याचे प्रकरण समोर आले आहे. यादरम्यान त्या युवकाला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आला आहे. या युवकाने शेजारी राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीबरोबर टिकटॉक व्हिडिओ करुन अपलोड केला होता. त्या रागातूनच हा प्रकार करण्यात आला. मुलीच्या वडील आणि भावाने हे कृत्य केले आहे. 

चीनकडून मोदींची प्रशंसा, 'कोरोनो'शी लढण्यासाठी दाखवली मदतीची तयारी

अतिरिक्त उपायुक्त मनोज चौधरी यांनी सांगितले की, ज्या युवकाला मारहाण करण्यात आली, त्याने एका १४ वर्षीय मुलीबरोबर व्हिडिओ चित्रित करुन तो टिकटॉकवर अपलोड केला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी युवकाला मारहाण केली आणि त्याला कपडे उतरवण्यास भाग पाडले. मुलीने युवकाविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. 

आरएसएसची कार्यालये, पदाधिकारी दहशतवाद्यांच्या रडारवर

ही घटना जयपूरच्या जवाहर नगर परिसरात घडली. एका युवकाने अल्पवयीन मुलीबरोबर टिकटॉकवर व्हिडिओ बनवला. दोघेही एकमेकांचे शेजारी आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुलीच्या घरचे नाराज झाले. तिच्या वडील आणि भावाने इतर लोकांच्या मदतीने त्या युवकाला बेदम मारले आणि विवस्त्र केले.

आतापर्यंत गड्यालाही जमलं नाही ते या महिला क्रिकेटरनं करुन दाखवलं

विवस्त्र करुन त्याला रस्त्यावर फिरवले आणि बेल्टने पुन्हा मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा त्यांनी व्हिडिओ केला. हा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. पीडित युवकाने संबंधितांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तर मुलीच्या नातेवाईकांनीही युवकाविरोधात पोक्सो एक्ट आणि एससी-एसटी एक्टनुसार तक्रार दाखल केली आहे.