पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जामिया गोळीबार : कपडे खरेदीच्या पैशांमधून बंदूक आणि गोळ्यांची खरेदी

कपडे खरेदीच्या पैशांमधून बंदूक आणि गोळ्यांची खरेदी

जामियाच्या विद्यार्थ्यांवर ज्या युवकानं गोळीबार केला  त्यानं कपडे खरेदीच्या पैशांतून बंदूक आणि गोळ्यांची खरेदी केली असल्याचं चौकशीतून उघड झालं. या युवकाला चुलतभावाच्या विवाहसोहळ्यासाठी नवे कपडे शिवण्यासाठी १० हजार रुपये देण्यात आले होते, मात्र त्यानं देशी बनावटीची बंदूक विकत घेतली. लग्नसमारंभात स्वागताच्या वेळी हवेत गोळी झाडून स्वागत करायचं आहे असं खोटं सांगून त्यानं बंदूक खरेदी केली. तसेच विक्रेत्याकडून त्यानं दोन गोळ्याही घेतल्या असल्याचं पोलिस चौकशीतून समोर आलं आहे. 

अपुऱ्या निधीमुळे कोरेगाव-भीमा चौकशी आयोग गुंडाळण्याची शिफारस

मित्राच्या मदतीनं तो अवैधरित्या बंदूक विकणाऱ्याच्या संपर्कात आला होता. जामिया समन्वय समितीने महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीविरोधात गुरुवारी जामिया ते राजघाटापर्यंत मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच एक तरुण हातातील बंदूक विद्यार्थ्यांच्या दिशेने रोखत निघाला होता. त्याने केलेल्या गोळीबारात जामियाचा विद्यार्थी शाबाद जखमी झाला होता. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या तरुणाला अटक केली. या तरुणाविरोधात हत्येचा प्रयत्न आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.न्यायालयाने त्याला १४ दिवसांची प्रतिबंधात्मक कोठडी सुनावली आहे. 

कोरोना विषाणू : ३२४ भारतीयांना चीनमधून विशेष विमानानं परत आणले