पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ट्रॅफिक पोलिसांनी वाद घातल्याने सॉफ्टवेअर तंत्रज्ञाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

प्रातिनिधिक छायाचित्र

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या संशयावरून पोलिसांनी वाद घातल्यामुळे ३५ वर्षांच्या एका सॉफ्टवेअर तंत्रज्ञाचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा आरोप संबंधित तरुणाच्या वडिलांनी केला आहे. रविवारी गाझियाबादमध्ये ही घटना घडल्याची माहिती नोएडा पोलिसांनी दिली. 

कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागू होईल : चंद्रकांत पाटील

गौतम बुद्ध नगरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक वैभव कृष्णा म्हणाले, प्राथमिक चौकशीनंतर असे दिसून आले आहे की, मृत पावलेला तरूण मधुमेही होता. त्याचा ह्रदयविकारामुळे मृत्यू झाला. गाझियाबाद जिल्ह्यात सीआयएसएफजवळ रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. गाझियाबाद पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली आहे. 

मृत पावलेला तरूण एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करीत होता. तो त्याच्या वयस्कर पालकांसह गाडीतून निघाला असताना वाहतूक पोलिसांनी त्याची गाडी थांबविली आणि त्याच्याकडे चौकशी सुरू करण्यात आली.

भारत-पाकदरम्यान तणाव घटला, मदतीसाठी मी तयारः डोनाल्ड ट्रम्प

या संदर्भात पीडित तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटार वाहन कायद्यातील सुधारणांच्या नावाखाली वाहतूक पोलिसांनी आम्हाला थांबविले आणि आमच्याशी गैरवर्तणूक करण्यात आली. वाहतूक पोलिसांनी चौकशी करणे गैर नाही. पण त्यांनी शांतपणे वाहनचालकांना प्रश्न विचारले पाहिजेत. आम्ही त्या दिवशी वेगाने गाडी चालवत नव्हतो. त्याचबरोबर कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले नव्हते. तरीही वाहतूक पोलिस त्यांच्या हातातील बॅटन आमच्या गाडीवर जोरात आपटत होते. ही काही चौकशी करण्याची पद्धत नाही. वाहतूक पोलिसांनी अशा पद्धतीने चौकशी करणे हे कोणत्याही नियमाला धरून नाही, असेही त्यांनी सांगितले.