पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुषमा स्वराज यांचे अंत्यदर्शन घेतल्यावर अडवाणींच्या डोळ्यात पाणी, मोदीही भावूक

नरेंद्र मोदी यांनी सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना अश्रू अनावर झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा अंत्यदर्शन घेतल्यावर भावूक झाले होते. वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी बुधवारी सकाळी सुषमा स्वराज यांच्या निवासस्थानी भेट देऊन अंत्यदर्शन घेतले. यामध्ये युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसचे मावळते अध्यक्ष राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव, बसपाच्या नेत्या मायावती, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा समावेश आहे. 

सुषमा स्वराज यांनी ती फी घेण्यासाठी हरिश साळवेंना घरी बोलावले होते आणि...

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुद्धा सुषमा स्वराज यांच्या निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतले. लालकृष्ण अडवाणी आपल्या मुलीसह अंत्यदर्शनाला आले होते. ज्यावेळी ते सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांची भेट घेण्यासाठी पोहोचले, त्यावेळी त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्याचे पाहायला मिळाले. त्यांची मुलगी प्रतिभा अडवाणी यांच्याही डोळ्यातून अश्रू आल्याचे पाहायला मिळाले. नरेंद्र मोदी हे सुद्धा सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतल्यावर भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते. ते काही वेळ सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाकडे बघत शांत उभे होते.

सुषमा स्वराज यांच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीतही हळहळ

सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने एम्समध्ये निधन झाले. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना लगेचच एम्समध्ये दाखल करण्यात आले. पण तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. काही देशांच्या राजदूतांनीही सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.