पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चिदंबरम यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांकडून मोदींविरोधात घोषणा

पी. चिदंबरम यांच्या घराबाहेर राडा

आयएनएक्स मीडिया प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या चौकशीसाठी सीबीआय पथक त्यांच्या जोर बाग या निवासस्थानी दाखल झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी कारवाईमध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. कार्यकर्ते आणि तपास यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांमध्ये झटापट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पी. चिदंबरम यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी  करत कारवाईला विरोध केला. 

सीबीआयने मुख्यालयात यासंदर्भात माहिती देऊन अतिरिक्त फौज फाटा बोलवण्यात आला होता. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. ईडी तसेच सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी घरामध्ये घुसून पी. चिदंबरम यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. निवासस्थानामध्ये या सर्व घटना घडत असताना कार्यकर्त्यांनी निवासस्थानाबाहेर विरोध करत होते.     

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: team enters the residence of P Chidambaram congress workers slogan against bjp and modi front of house