पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू आणि पुत्र नारा लोकेश नजरकैदेत

माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू

आंध्र प्रदेशमध्ये विद्यमान वायएसआरसीपी सरकार आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या टी़डीपी दरम्यान वादाला नवे वळण लागले आहे. चंद्राबाबू हे पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांबरोबर गुंटूर जिल्ह्यात सरकारविरोधात मोर्चा काढणार होते. परंतु, मोर्चाला परवानगी न मिळाल्यामुळे त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना आणि त्यांचे पुत्र नारा लोकेश यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. 

दरम्यान, टीडीपीने आजपासून (बुधवार) आंदोलनाचे आवाहन केले आहे. त्यानंतर राज्यातील गुंटूर जिल्ह्यातील पलनाडू परिसरात पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. टीडीपीने वायएसआर काँग्रेसकडून त्यांच्या कार्यकर्त्यांवर होत असलेल्या हल्ल्यांविरोधात मोर्चाचे आवाहन केले आहे. त्यानंतर वायएसआर काँग्रेसनेही उत्तरादाखल मोर्चा काढण्याची योजना केली आहे. पोलिसांना राज्यातील टीडीपीच्या अनेक नेत्यांना नजकैदेत ठेवले आहे.

चंद्राबाबू नायडू सकाळी मोर्चाला निघणार होते. पण त्यांना रोखण्यात आले. त्यानंतर ते आपल्याच घरी १२ तास उपोषणाला बसण्याची घोषणा केली. त्यांनी टीडीपीच्या कार्यकर्त्यांनाही उपोषण करण्याचे आवाहन केले. त्यानंतर त्यांना आणि त्यांचे पुत्र नारा लोकेश यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. टीडीपीच्या नेत्यांसह वायएसआरसीपीच्या नेत्यांनाही नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्यांनाही टीडीपीच्या आंदोलनाला उत्तर देण्यापासून रोखण्यासाठी प्रशासनाने ही भूमिका घेतली आहे.