पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उन्नाव येथे हिंदुस्थान पेट्रोलियमच्या प्लांटमध्ये स्फोट

हिंदुस्थान पेट्रोलिअमच्या प्लांटमध्ये स्फोट

उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथे हिंदुस्थान पेट्रोलियमच्या प्लांटमध्ये मोठा स्फोट झाला आहे. प्लांटमधील एका टाकीमध्ये अचानक स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. स्फोटामुळे प्लांटच्या आसपासच्या गावांमध्ये मोठा आवाज ऐकू आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला: शस्त्र साठ्यासह तिघांना अटक

उन्नाव शहराच्या दहीचौकी परिसरातील हिंदुस्थान पेट्रोलियम गॅस प्लांटमध्ये गुरूवारी अचानक स्फोट झाला. गॅस भरत असताना टाकीच्या वॉलमधून गॅस लीक झाल्यामुळे आग लागली असल्याचे प्राथमिक कारण सांगण्यात येत आहे. प्लांटमध्ये अचानक आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. सर्व कर्मचाऱ्यांची पळापळ झाली. या दुर्घटनेमध्ये प्लांट अधिकाऱ्यासह १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना ताबडतोब नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामधील तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. 

पुढच्या वर्षी लवकरच येणार बाप्पा!

दहीचौक आणि आसपासच्या गावांना खाली करण्यात आले आहे. तसंच आसपाच्या कंपन्यांना देखील खाली करण्यात आली आहे. तसंच दोन किलोमीटर पर्यंतचा परिसर सील करण्यात आला आहे. त्याचसोबत आसपासच्या शाळा, महाविद्यालय बंद करण्यात आले. तसंच या ठिकाणावरुन जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. 

'पद्म' पुरस्कारांसाठी या महिला खेळाडूंच्या नावांची शिफारस