पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'लष्कर'चे ६ दहशतवादी श्रीलंकेतून भारतात दाखल, तामिळनाडूत हायअलर्ट

'लष्कर'चे ६ दहशतवादी श्रीलंकेतून भारतात दाखल, तामिळनाडूत हायअलर्ट (PTI FILE Photo)

तामिळनाडूमध्ये दहशतवादी घुसल्याचा गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानंतर राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री गुप्तचर यंत्रणांनी लष्कर ए तोयबाचे सहा दशतवादी कोईमतूरमध्ये घुसल्याचा इशारा दिला आहे. 

श्रीलंकेतून हे दहशतवादी घुसले असून ते तामिळनाडू किंवा केरळमध्ये हल्ला करु शकतात अशी माहिती गुप्तचर यंत्रणानी दिल्यानंतर तामिळनाडूच्या गृह विभागाकडून  राज्यात अलर्ट जारी करण्यात आला.

पीटर, इंद्राणी मुखर्जीला कधीच भेटलो नाही : कार्ती चिदंबरम

कोईमतूर आणि चेन्नईच्या पोलिस आयुक्तांनी यांनी अलर्ट जारी केल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. तामिळनाडूतील सर्व प्रमुख शहरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 

पोलिस सूत्रांनी अलर्टबाबत सांगितले की, एक दहशतवादी पाकिस्तानमधील असून उर्वरित पाच जण हे श्रीलंकेतील आहेत. हे सर्व समुद्र मार्गाने आले आहेत. पाकिस्तानी दहशतवाद्याचे नाव इलियास अन्वर आहे. मॉल्स, सार्वजनिक स्थळं, रेल्वे स्थानकं आणि बस स्थानकांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 

दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या झाली: रणदीप सुरजेवाला

जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यापासून पाकिस्तान बिथरला आहे. दोन्ही देशातील संबंधात वितुष्ठ निर्माण झाले आहे. सरकारने दहशतवादी संघटनांकडून संभाव्य हल्ल्याचा इशारा दिला होता. दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर गेल्या आठवड्यात बंगळुरुतही हाय अलर्ट जारी करण्यात आला होता.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Tamil Nadu on alert after midnight intel warning of six Lashkar terrorists entering state