पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आता चर्चा फक्त POKवरच, राजनाथ सिंह यांनी ठणकावलं

राजनाथ सिंह

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी इशारा दिला आहे. आता पाकिस्तानबरोबर जी चर्चा होईल ती पाक व्याप्त काश्मीर (पीओके) वरच होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. हरयाणातील कालका येथील एका सभेत राजनाथ सिंह हे बोलत होते. 

JNUला मोदींचे नाव द्या, भाजप खासदाराची मागणी

राजनाथ सिंह म्हणाले की, पुलवामा हल्ल्यात आपल्या शूर जवानांबाबत जे झाले, त्यानंतर ५६ इंच छातीच्या आमच्या पंतप्रधानांनी चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला. हवाई दलाच्या आपल्या जवानांनी बालाकोटमध्ये जाऊन दहशतवाद्यांचा सफाया करण्यात यशस्वी झाल्याचे तुम्ही पाहिले आहे. 

पाकिस्तानचे पंतप्रधान पूर्वी म्हणत होते की, काही झालेच नाही. एकही मनुष्य मारला गेला नाही. आता तेच पीओकेत उभे राहून भारत बालाकोट एअर स्ट्राइकपेक्षाही मोठा हल्ला करण्याचा विचार करत आहेत, असे म्हणत आहेत. यावरुन स्पष्ट होते की, पाकच्या पंतप्रधानांनीही बालाकोटमध्ये भारताने मोठा हल्ला केल्याचे स्वीकारले आहे

पाकवर निशाणा साधताना ते म्हणाले की, कलम ३७० संपुष्टात आणल्यानंतर आपला एक शेजारी आहे. जो दुबळा होत आहे. त्यांचे पोट खराब झाले आहे. आता ते जगातील देशांचे दरवाजे ठोठावत वाचवण्याची विनंती करत आहेत. आम्ही काय गुन्हा केला असा सवाल राजनाथ सिंह यांनी केला. ते थांबून थांबून धमकी देत आहेत. पण लोक ज्याला जगातील सर्वांत ताकदवान देश मानतात, त्या अमेरिकेनेही त्यांना भारताबरोबर चर्चा करण्यास जा, इथे येण्याचा गरज नसल्याचे सांगितले आहे. 

भारत ऐतिहासिक बदलातून जात आहे, भूतानमध्ये पंतप्रधान मोदींचे वक्तव्य

मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की, सरकार राहो अथवा न राहो, भारताची मान झुकली नाही पाहिजे. दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली पाहिजे, असे पाकिस्तानातील लोकही म्हणत आहेत. कोणत्या गोष्टीवर चर्चा व्हायला हवी? कोणता मुद्दा आहे, काय चर्चा झाली पाहिजे ? पाकिस्तानबरोबर तेव्हाच चर्चा होईल, जेव्हा त्यांच्या भूमीवरुन कार्यरत असलेला दहशतवाद बंद होईल. जर असे झाले नाही तर चर्चा करण्यात कोणताच अर्थ नसेल. आता यापुढे जी चर्चा होईल ती पीओकेवरच होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.