पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तालिबानने ११ दहशतवाद्यांच्या बदल्यात ३ भारतीय अभियंत्यांना सोडले

तालिबानने ११ दहशतवाद्यांच्या बदल्यात ३ भारतीय अभियंत्यांना सोडले

अफगाणिस्तानमध्ये सुमारे १७ महिन्यांपासून तालिबानी दहशतवाद्यांच्या ताब्यात असलेल्या सहा भारतीय अभियंत्यांपैकी तिघांना आपल्या देशात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अफगाण तालिबानने आपल्या आघाडीच्या ११ दहशतवाद्यांच्या बदल्यात तीन भारतीय अभियंत्यांना मुक्त केले आहे. 

माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, दहशतवादी आणि अभियंत्यांची रविवारी अदलाबदली झाल्याचे तालिबानच्या दोन सदस्यांनी सांगितले. पण हे कुठे केले हे मात्र त्यांनी सांगितले नाही. अफगाणिस्तानच्या उत्तर बघलान प्रांतातील एका ऊर्जा संयंत्रात काम करणाऱ्या सात भारतीय अभियंत्यांचे मे २०१८ मध्ये अपहरण करण्यात आले होते. यातील एकाला यावर्षी मार्चमध्ये सोडण्यात आले होते. त्यानंतर तो भारतात परतला होता. तर उर्वरित अभियंत्यांबाबत काहीच माहिती मिळू शकली नव्हती. या सर्व भारतीयांच्या नावाचा खुलासा करण्यात आला नव्हता. 

एनआरसीतून बाहेर गेलेल्या लोकांबाबत सरकारचे नियोजन काय?- चिदंबरम

सोडण्यात आलेले दहशतवादी तालिबान प्रशासनातील गव्हर्नर 

तालिबानच्या सदस्यांनी सांगितले की, तालिबानचे शेख अब्दूर रहिम आणि मौलवी अब्दूर रशीदलाही सोडले आहे. २००१ मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सैन्याकडून हटवले जाण्यापूर्वी तालिबान प्रशासनत क्रमशः कुनार आणि निम्रोज प्रांतातील विद्रोही गटाचे गव्हर्नर म्हणून काम करत होते. या दहशतवाद्यांची राजधानी काबूलच्या उत्तर भागात असलेल्या बगराम सैन्य दलाच्या शिबिराजवळील अफगाणिस्तानच्या सर्वांत मोठ्या कारागृहातून मुक्त करण्यात आले. 

स्वीस बँकेत भारतीयांचे किती पैसे? सप्टेंबर २०२०ला समजणार

ज्यावेळी भारतीयांना पकडण्यात आले, त्यावेळी हे अभियंते बघलान राज्याची राजधानी पुल-ए-खुम्रीजवळील बाग-ए-शमलमध्ये विजेचे एक उपकेंद्र उभारत होते. अफगाणिस्तान सरकारचे प्रतिनिधी असल्याच्या संशयावरुन या अभियंत्यांना पकडण्यात आले होते. हे सर्वजण भारतीय कंपनी केईसीचे कर्मचारी होते. 

दिवाळीत फटाके फोडू नका; प्रकाश जावडेकरांचा दिल्लीकरांना सल्ला