पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा, केंद्राचे राज्यांना निर्देश

लॉकडाऊन काळातही नागरिक बिनाधास्त फिरत आहेत व सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र

केंद्र आणि राज्य सरकारने रविवारी उत्तर प्रदेश, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि महाराष्ट्रातील ७५ जिल्ह्यात संपूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. अशात केंद्रानेही आता राज्यात लॉकडाऊनला सक्तीने लागू करण्याच्या आणि त्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले आहे. दिल्ली पोलिसांनीही संपूर्ण दिल्लीत ३१ मार्चपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आली आहेत. 

स्वतःला वाचवा, कुटुंबाचाही विचार करा, नाराज PM मोदींचे आवाहन

कोरोना विषाणूचा प्रभाव सातत्याने वाढताना दिसत आहे. भारतात दोन दिवसांत सुमारे १३७ पेक्षा जास्त नवीन प्रकरणे समोर आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात या विषाणग्रस्त लोकांची संख्या ३९६ वर पोहोचली आहे. तर यात मृत्यु होणाऱ्यांची संख्याही चारवरुन सात इतकी झाली आहे. संक्रमित झालेल्या लोकांपैकी ४१ जण विदेशी नागरिक आहेत तर तास जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे नवे प्रकरण महाराष्ट्र, बिहार आणि गुजरातमधून समोर आले आहेत. महाराष्ट्रातील मृतांची संख्या दोन झाली आहे. आतापर्यंत दिल्ली, कर्नाटक आणि पंजाबमधील एक-एक जणांचा मृत्यू झाला आहे. २४ जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे.

चीनमधून दिलासादायक बातमी, वुहानमध्ये मागील ५ दिवसांत एकही रुग्ण नाही

दरम्यान, लॉकडाऊन काळातही नागरिक बिनाधास्त फिरत आहेत व सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेचा विचार करा असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी टि्वटद्वारे केले आहे. नागरिक गांभीर्याने वागत नसल्याने आता केंद्र सरकारने सर्व राज्यांना सक्तीचे धोरणा अवलंबण्याचे निर्देश दिले आहेत.