पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लवकरच पर्यटकांना रात्रीही न्याहाळता येणार ताजमहालाचे सौंदर्य!

ताजमहाल

पर्यटकांना आता ताजमहालाचे सौंदर्य रात्रीच्यावेळीही न्याहाळता येणार आहे. ताजमहाल रात्रीच्यावेळीही पर्यटकांसाठी खुला ठेवण्यावर केंद्र सरकार विचार करीत आहे आणि या संदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी सांगितले. आयएएनएस या वृत्तसंस्थेला त्यांनी ही माहिती दिली. सध्या ताजमहाल पर्यटकांसाठी सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत खुला असतो. त्याचबरोबर महिन्यातून पाच दिवस तो रात्रीच्यावेळीही पर्यटकांसाठी खुला ठेवण्यात येतो.

अमित शहांचे कौतुक करताना मुकेश अंबानी काय म्हणाले माहितीये?

प्रल्हाद सिंह पटेल म्हणाले, ताजमहाल रात्रीच्यावेळीही पर्यटकांसाठी खुला ठेवण्यात यावा, यासाठी आमच्याकडे अनेक अर्ज येत आहेत. आता लवकरच आम्ही त्यावर निर्णय घेणार आहोत आणि पर्यटकांच्या मागणीला वास्तवात उतरविणार आहोत. 

ताजमहाल जर रात्रीच्या वेळी पर्यटकांसाठी खुला करण्यात आला तर त्याप्रमाणे या भागातील व्यवस्थाही बदलण्यात येणार आहे. ताजमहालाच्या परिसरात आवश्यक सोयीसुविधा वाढविण्यात येणार असून, रात्रीच्या वेळी येणारी गर्दी कशा पद्धतीने नियंत्रित करायची, याचेही नियोजन करण्यात येत आहे. 

कपटी पाकने खोटेपणाचा कळस गाठलाय; भारताने फटकारले

सध्या पौर्णिमा आणि त्याच्या आदल्या दोन दिवशी आणि पुढल्या दोन दिवशी ताजमहाल रात्रीच्यावेळीही पर्यटकांसाठी खुला असतो. तो आता सर्व दिवस रात्रीच्या वेळी खुला ठेवण्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल.