पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली हिंसाचार : ताहिर हुसैनच्या भावालाही अटक

ताहिर हुसेन  Photo by Sanjeev Verma

दिल्ली हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी सोमवारी शाह आलम याला अटक केली. शाह आलम हा आम आदमी पक्षातून निलंबित करण्यात आलेला नगरसेवक ताहिर हुसैन याचा भाऊ आहे. एएनआयने या संदर्भातील वृत्त प्रसारित केले आहे. गुप्तचर विभागातील अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येचा आरोप ताहिर हुसैन याच्यावर आहे. त्याला या प्रकरणी आधीच अटक करण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसमुळे ऍपल ग्राहकांना वेगळाच फटका

या प्रकरणी तपास करीत असताना शाह आलम याचे नाव पुढे आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली. ताहिर हुसैन याला गेल्या आठवड्यात गुरुवारी अटक करण्यात आली होती. अंकित शर्मा यांचे वडील रविंद्र कुमार यांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत ताहिर हुसैन याचे नाव घेतले होते. 

मनसेचं 'शॅडो कॅबिनेट' जाहीर, पाहा यादी

गेल्या शुक्रवारी दिल्लीतील न्यायालयाने ताहिर हुसैन याला सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तपासात असे दिसून आले आहे की, चांदबागमध्ये हिंसाचार सुरू असताना तिथे अडकून पडलेल्या काही महिलांची सुटका करण्याच्या प्रयत्नात अंकित शर्मा होते. त्याचवेळी त्यांची हत्या करण्यात आली. ज्यावेळी अंकित शर्मा यांची हत्या करण्यात आली. त्यावेळी ताहिर हुसैन चांदबागमध्येच होता, अशीही माहिती मिळाली असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी साांगितले.