पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

NRC मुद्द्याला भाजपचा केवळ अल्पविराम, प्रशांत किशोर यांची टीका

प्रशांत किशोर

राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात एनआरसीच्या मुद्द्यावरून निवडणूक प्रचार रणनितीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली. एनआरसी संदर्भात अजून कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे सरकारचे म्हणणे हे तात्पुरते आहे, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. याआधीही एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) यावरून त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली होती.

'...या पुढे यु-टर्न हा उद्धव ठाकरे टर्न म्हणून ओळखला जाईल'

प्रशांत किशोर यांनी गुरुवारी सकाळी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, एनआरसीवर अजून चर्चाच झालेली नसल्याचे म्हणणे हे व्यूहात्मक माघार आहे. देशात या मुद्द्यावरून आंदोलने सुरू झाल्यामुळे हे वक्तव्य करण्यात आले आहे. पण असे म्हणणे म्हणजे या मुद्द्याला पूर्णविराम निश्चितच नाही. केवळ तूर्त हा विषय थांबविण्यात आला आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. या संदर्भात जर सर्वोच्च न्यायालयाने सुधारित कायद्याच्या बाजूने निकाल दिला. तर भाजप सरकारकडून पुन्हा एकदा एनआरसीचा मुद्दा उचलला जाऊ शकतो, असेही प्रशांत किशोर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

...म्हणून सरकार चालवण्यासाठी कसरत करावी लागते: फडणवीस

प्रशांत किशोर हे बिहारमधील संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्षही आहेत. त्यांच्या पक्षाने संसदेत नागरिकत्व कायद्यात सुधारणेच्या बाजूने मतदान केले होते. त्यावेळीही प्रशांत किशोर यांनी वेगळी भूमिका घेऊन आपल्या पक्षाला खडे बोल सुनावले होते. प्रशांत किशोर यांनी या विषयावर वेगळी भूमिका घेतल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले होते. प्रशांत किशोर आपल्या पक्षाचा राजीनामा का देत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी ट्रोल करणाऱ्यांनी विचारला होता.