पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मलेशियाला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या 'तबलिगी'च्या ८ जणांना अटक

दिल्ली विमानतळाचे संग्रहित छायाचित्र

तबलिगी जमातीशी निगडीत काही लोक अजूनही सुधारण्याचे नाव घेताना दिसत नाहीत. मलेशिया येथून आलेल्या तबलिगी जमातीच्या काही लोकांनी रविवारी भारतातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरच पकडण्यात आले. सध्या या सर्व लोकांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तबलिगी जमातीच्या ८ सदस्यांना आयजीआय विमानतळावर पकडले. हे सर्व मलेशियाचे असून मलेशियातून मदतीचे साहित्य घेऊन आलेल्या विमानात ते चढण्याचा प्रयत्न करत होते. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. 

पुण्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू, बाधितांचा आकडा ६६१ वर

निजामुद्दीन येथील तबलिगी जमातीच्या कार्यक्रमात मागील महिन्यात हजारो लोक सहभागी झाले होते. यामध्ये भारताशिवाय १६ इतर देशातील नागरिकही सामील झाले होते. यामध्ये सहभागी झालेल्या लोकांपैकी अनेकांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. भारतात तबलिगी जमातीचे आतापर्यंत एक हजारहून अधिक लोक कोरोनाबाधित आढळले आहेत. देशात आतार्यंत आढळून आलेल्या रुग्णांपैकी सुमारे ३० टक्के रुग्ण हे तबलिगी जमातीचे आहेत. 

पती घानात, कोरोनाग्रस्त पत्नी ICUत, मुलाला बाधा, दिव्यांग मुलगी घरी

दुसरीकडे दिल्ली पोलिस गुन्हे शाखेचे एक पथक निजामुद्दीन मरकजला पोहोचले असून या प्रकरणाच्या तपासाला ते लागले आहेत. १ एप्रिलला येथून सुमारे २३ लोकांना बाहेर काढण्यात आले होते. तबलिगी जमातीचे प्रमुख मौलाना साद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.