पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तबलिगी जमात कोरोना विषाणूची फॅक्टरीः विश्व हिंदू परिषद

तबलिगी जमात (संग्रहित छायाचित्र)

तबलिगी जमात कोरोना विषाणूचा कारखाना असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेने (व्हीएचपी) केला आहे. लोकांना मशिदी, मरकज आणि मदरसांच्या बाहेर आणण्याऐवजी केंद्र आणि राज्य सरकारांनी या विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून त्यांना क्वारंटाइन केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री मोहसिन रजा यांनी जमात ही कट्टरपंथी संघटना असल्याचा आरोप केला आहे. 

मुले परराज्यात अडकली, ७० वर्षांच्या पत्नीनेच दिला पतीला अग्नी

एका संयुक्त निवेदनात व्हीएचपीचे अध्यक्ष व्ही एस कोकजे, व्हीएचपीचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोककुमार आणि सरचिटणीस मिलिंद परांदे यांनी म्हटले की, दिल्लीमध्ये तबलिगी जमातीचा कार्यक्रम राष्ट्रव्यापी लॉकडाऊनचा उद्देश अयशस्वी करु शकतो. लॉकडाऊनदरम्यान जेव्हा सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आले. तेव्हा देशातील मुस्लिम समुदायाने पुढे येऊन देशातील सर्व मशिदी लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत बंद करायला हवे होते. सरकारने जे मौलवी विदेशात गेले होते, अशांचा व्हिसा रद्द करायला हवा. त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई सुरु केली पाहिजे, अशी मागणी केली.  

मोदींच्या आवाहनावर आव्हाड-मलिकांची टीका तर रोहित पवारांकडून स्वागत

दरम्यान, मोहिसन रझा यांनी तबलिगी जमात ही एक कट्टरपंथी संघटना असल्याचा आरोप केला. तर शिया वक्फ बोर्डचे प्रमुख वसिम रिझ्वी यांनी या संघटनेने आत्मघातकी हल्लेखोर तयार केल्याचा आरोप केला. दोन्ही नेत्यांनी राष्ट्रविरोधी हालचालींमधील सहभागामुळे अशा संघटनांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

रामायण, महाभारतासह डिस्कवरी ऑफ इंडियाही दाखवा, काँग्रेसची मागणी