पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आम्ही तुमचे ऐकतो, तुम्ही पण आमचे ऐका; चिदंबरम यांचा पंतप्रधानांना टोमणा

पी चिदंबरम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूविरोधातील लढाईत येत्या रविवारी, ५ एप्रिलला रात्री नऊ वाजता घरात अंधार करून खिडकी किंवा गच्चीत उभे राहून टॉर्च किंवा मेणबत्ती लावण्याचे आवाहन देशवासियांना केले. त्यांच्या याच आवाहनावर काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी टोमणा लगावला आहे. आम्ही तुमचे ऐकतो. पण तुम्ही पण आमचे ऐका, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. 

'कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होईल असे सध्या तरी दिसत नाही'

नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर केलेल्या ट्विटमध्ये चिदंबरम यांनी म्हटले आहे की, प्रिया नरेंद्र मोदी, आम्ही तुमचे ऐकतो. ५ एप्रिलला टॉर्च लावतो. पण बदल्यात तुम्हीसुद्धा आमचे ऐका. देशातील काम करणारा प्रत्येक माणूस, उद्योगपती, रोजंदारीवर काम करणारा व्यक्ती यांनाही आता तुम्ही आर्थिक आघाडीवर उपाय योजण्याची अपेक्षा आहे. देशाची आर्थिक गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी उपाय योजण्याची अपेक्षा आहे. पण लोक या आघाडीवर निराश झाले आहेत. प्रतिकात्मकता महत्त्वाची आहेच. पण त्याचवेळी काही गंभीर पावले उचलणे, निर्णय घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे अन्य नेते शशी थरूर यांनीही नरेंद्र मोदींच्या व्हिडिओ संदेशावर टीका केली. पंतप्रधानांच्या संदेशात दूरदृष्टिकोनाचा अभाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कोविड १९ रुग्णांना मलेरियारोधक औषधे दिल्यास ह्रदयाला धोका, नवे संशोधन

रविवारी रात्री नऊ वाजता घरातील दिवे बंद करून खिडकीमध्ये किंवा गच्चीमध्ये उभे राहून नागरिकांनी मेणबत्ती किंवा टॉर्च लावावा. देशातील १३० कोटी नागरिक एकत्रितपणे या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत. अंधारावर विजय मिळवण्यासाठी सज्ज आहेत हा संदेश या माध्यमातून द्यावा, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले होते.