पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दक्षिण आशियातील पहिल्या आंतरराष्ट्रीय पेट्रोल पाईपलाईनचे मोदींकडून उदघाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारत आणि नेपाळ या दोन देशांमधील पहिल्या आंतरराष्ट्रीय पेट्रोल पाईपलाईनचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. दक्षिण आशियातील आंतरराष्ट्रीय स्वरुपाची ही पहिलीच पाईपलाईन आहे. मोतीहारी ते अमलेखगंज या दोन्ही शहरांमधील ही पाईपलाईन भारत आणि नेपाळच्या मैत्रीचे प्रतिक ठरेल, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

तयारी विधानसभेची!, शरद पवारांनी घेतली सोनिया गांधींची भेट

१९९६ मध्ये पहिल्यांदा या दोन्ही देशांमध्ये पेट्रोलसाठी पाईपलाईनचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पण २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर त्यांच्या नेपाळ भेटीमध्ये या पाईपलाईनच्या कामाला वेग देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर नवी दिल्लीमध्ये या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. 

नरेंद्र मोदी म्हणाले, दक्षिण आशियातील आंतरराष्ट्रीय स्वरुपाची पाईपलाईन विक्रमी वेळेत पूर्ण झाली हा आमच्यासाठी समाधानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. नियोजित वेळेपेक्षा आधीच ही पाईपलाईन पूर्ण झाली आहे. 

'घ्या बॅलेट पेपरवर निवडणुका, देतो राजीनामा...'

नेपाळच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याच्या भारतच्या भूमिकेचा नरेंद्र मोदी यांनी यावेळी पुनरुच्चार केला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Symbol of close bilateral relations PM Modi inaugurates Asias first cross border petroleum pipeline