पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली हिंसाचार : पोलिस दलात मोठे फेरबदल होण्याचे संकेत

दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री हायकोर्टात सुनावणी झाली.

ईशान्य दिल्लीतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बुधवारी संध्याकाळी दोन तास बैठक घेतली. आता या भागातील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. ईशान्य दिल्लीत शांतता कायम राहावी, यासाठी प्रयत्न सुरूच राहणार आहेत. गेल्या सोमवारी आणि मंगळवारी या भागात घडलेल्या घडामोडी नेमक्या कशामुळे घडल्या, याचा प्राथमिक निष्कर्ष केंद्रीय गृह मंत्रालयाने काढला आहे. त्यानुसार दिल्ली पोलिसांनी हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी निष्क्रियता दर्शविल्याचे दिसून आले. या हिंसाचारानंतर दिल्ली पोलिस दलात मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत. 

दिल्ली दंगलीची सुनावणी घेणाऱ्या न्यायाधीशांची बदली, काँग्रेसची टीका

सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार होते. त्यामुळे दिल्लीतील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली होती. यामुळे दिल्ली पोलिसांनी ईशान्य दिल्लीतील घडामोडींकडे हवे तितके लक्ष दिले नाही. त्याचबरोबर या भागात खूप घनदाट वस्ती आहे. रस्तेही चिंचोळे आहेत. त्यामुळेही दिल्ली पोलिसांनी स्वतःहून आवश्यक कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचे दिसून आले आहे. दिल्ली पोलिसांनी कोणताही कारवाई केली असती तर त्याचे संतप्त पडसाद दोन्ही गटांत उमटले असते. त्यामुळे आणखी जास्त नुकसान झाले असते, असाही निष्कर्ष काढण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

प्रशांत किशोर यांच्याविरोधात कल्पना चोरल्याचा आरोप, फसवणुकीचा गुन्हा

दिल्ली हिंसाचारात सहभागी असलेले अनेक दंगेखोर हे लगतच्या राज्यातून आले होते. दंगल घडविण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात लगतच्या राज्यातून तरूण येतील, असे दिल्ली पोलिसांना वाटले नव्हते. आता या तरुणांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.