राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात गुरुवारी संध्याकाळी होणाऱ्या नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास राहिले असताना दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा गुरुवारी सकाळी नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी दाखल झाले. गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने शहा आणि मोदी यांच्यात चर्चा सुरू आहे. मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यायचे, खाते कोणते असेल, यावरच ही चर्चा होते असल्याचे सूत्रांनी सांगितले. मंगळवारी दोघांमध्ये चार तास चर्चा झाली. त्यानंतर बुधवारी पुन्हा तीन तास दोघांमध्ये चर्चा झाली. आज पुन्हा चर्चा होते आहे.
या परदेशी पाहुण्यासह हजारोंच्या उपस्थितीत रंगणार मोदींचा शपथविधी सोहळा
शपथविधी सोहळ्याला ६००० मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये परदेशातील मान्यवरांचाही समावेश आहे. अनेक परदेशी पाहुणे भारतात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. नवी दिल्लीतील विमानतळावर परराष्ट्र खात्यातील अधिकाऱ्यांकडून परदेशी पाहुण्यांचे स्वागत करण्यात येत आहे.
पश्चिम बंगालमध्ये गेल्या एक-दोन वर्षात राजकीय हिंसाचारात मृत पावलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांनाही शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आले आहे. या ५४ कार्यकर्त्यांचे कुटुंबियही गुरुवारी सकाळी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली अरुण जेटलींची भेट
युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सोहळ्याला येणार नाहीत. शपथविधी सोहळ्यात राजकारण केले जात असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आणि त्यांनी या कार्यक्रमाला येण्यास नकार दिला.