पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Narendra Modi Swearing in Ceremony : नरेंद्र मोदी यांनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ; गडकरी, गोयल, जावडेकर, सावंत यांनीही घेतली शपथ

पंतप्रधान नरेंद्र मोदी (अजय आग्रवाल)

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून ज्याची वाट बघितली जात होती. तो क्षण अखेर आला. नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात सलग दुसऱ्यांदा पद आणि गोपनीयतेची शपथ घेऊन देशाचे पंतप्रधानपद स्वीकारले. त्यांच्यासोबत भाजपचे अध्यक्ष अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, निर्माला सीतारामन, रामविलास पासवान, सदानंद गौडा आणि इतरांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्वांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मोदींच्या मंत्रिमंडळात एकूण ५७ मंत्र्यांचा समावेश असून यातील सात नावे ही महाराष्ट्रातील नेत्यांची आहेत.

शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवनात देशविदेशातील ८००० मान्यवर उपस्थित आहेत. संध्याकाळी सात वाजता शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली. शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवनाचे प्रांगण फुलांनी सजविण्यात आले होते. उद्योग, क्रीडा, मनोरंजन, माध्यम, शेती, आध्यात्मिक, अर्थ या क्षेत्रातील निमंत्रित या सोहळ्याला उपस्थित होते.

२३ मे रोजी देशातील जनतेने पुन्हा एकदा स्पष्ट कौल देत भाजपला लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून दिले. याच यशाचा औपचारिक सोहळा म्हणजे आज झालेला शपथविधी. नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्त्वाखाली केलेल्या प्रचाराच्या बळावर भाजपने लोकसभेत एकहाती ३०३ जागा जिंकल्या. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांसह ३५२ चा आकडा गाठला आहे. 

शपथविधी सोहळ्याचे LIVE UPDATES

देबश्री चौधरी यांनी राज्यमंत्री म्हणून घेतली शपथ

कैलाश चौधरी यांनी राज्यमंत्री म्हणून घेतली शपथ

प्रतापचंद्र सारंगी यांनी राज्यमंत्री म्हणून घेतली शपथ

रामेश्वर तेली यांनी राज्यमंत्री म्हणून घेतली शपथ

सोमप्रकाश यांनी राज्यमंत्री म्हणून घेतली शपथ

रेणुकासिंह सरगुजा यांनी राज्यमंत्री म्हणून घेतली शपथ

व्ही मुरलीधरन यांनी राज्यमंत्री म्हणून घेतली शपथ

रतनलाल कटारिया यांनी राज्यमंत्री म्हणून घेतली शपथ

नित्यानंद राय यांनी राज्यमंत्री म्हणून घेतली शपथ

सुरेशचंद्र बसप्पा अंगडी यांनी राज्यमंत्री म्हणून घेतली शपथ

अनुराग ठाकूर यांनी राज्यमंत्री म्हणून घेतली शपथ

संजय धोत्रे यांनी राज्यमंत्री म्हणून घेतली शपथ

डॉ. संजीवकुमार बालियान यांनी राज्यमंत्री म्हणून घेतली शपथ

बाबूल सुप्रियो यांनी राज्यमंत्री म्हणून इंग्रजीतून घेतली शपथ

साध्वी निरंजन ज्योती यांनी राज्यमंत्री म्हणून घेतली शपथ

रामदास आठवले यांनी राज्यमंत्री म्हणून घेतली शपथ

पुरुषोत्तम रुपाला यांनी राज्यमंत्री म्हणून घेतली शपथ

जी किशन रेड्डी यांनी राज्यमंत्री म्हणून घेतली शपथ

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राज्यमंत्री म्हणून घेतली शपथ

कृष्णपाल गुर्जर यांनी घेतली राज्यमंत्री म्हणून शपथ

जनरल (निवृत्त) व्ही के सिंह यांनी राज्यमंत्री म्हणून घेतली शपथ

अर्जुनलाल मेघवाल यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ

अश्विनीकुमार चौबे यांनी राज्यमंत्री म्हणून घेतली शपथ

फग्गनसिंह कुलस्ते यांनी राज्यमंत्री म्हणून घेतली शपथ

मनसुख मांडविया यांनी घेतली राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार म्हणून शपथ

हरदीपसिंग पुरी यांनी घेतली राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार म्हणून  शपथ

राजकुमार सिंह यांनी घेतली राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार म्हणून शपथ

प्रल्हाद सिंह पटेल यांनी राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार म्हणून घेतली शपथ

किरण रिजिजू यांनी राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार म्हणून घेतली शपथ

डॉ. जितेंद्र सिंह यांनी राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार म्हणून घेतली शपथ

श्रीपाद नाईक यांनी राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार म्हणून घेतली शपथ

राव इंद्रजित सिंह यांनी राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार म्हणून घेतली शपथ

संतोषकुमार गंगवार यांनी राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार म्हणून घेतली शपथ

गजेंद्रसिंह शेखावत यांनी हिंदीतून घेतली शपथ

गिरीराज सिंह यांनी हिंदीतून घेतली मंत्रिपदाची शपथ

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी हिंदीतून घेतली शपथ

डॉ. महेंद्रनाथ पांडे यांनी हिंदीतून घेतली शपथ

प्रल्हाद जोशी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

मुख्तार अब्बास नक्वी यांनी घेतली शपथ

धर्मेंद्र प्रधान यांनी हिंदीतून घेतली शपथ

पियुष गोयल यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

प्रकाश जावडेकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

डॉ. हर्षवर्धन यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

स्मृती इराणी यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

अर्जुन मुंडा यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

रमेश पोखरियाल निशंक यांनी हिंदीतून घेतली शपथ

माजी परराष्ट्र सचिव डॉ. सुब्रमण्यम जयशंकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

थावरचंद गेहलोत यांनी हिंदीतून घेतली शपथ

हरसिमरत कौर बादल यांनी घेतली इंग्रजीतून शपथ

रविशंकर प्रसाद यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

नरेंद्रसिंह तोमर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

रामविलास पासवान यांनी हिंदीतून घेतली शपथ

निर्मला सीतारामन यांनी इंग्रजीतून घेतली मंत्रिपदाची शपथ

डी व्ही सदानंद गौडा यांनी इंग्रजीतून घेतली शपथ

नितीन गडकरी यांनी मंत्रिपदाची शपथ

अमित शहा यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

अमित शहा यांचे नाव पुकारताच टाळ्यांचा गजर

राजनाथ सिंह यांनी हिंदीतून घेतली मंत्रिपदाची शपथ

नरेंद्र मोदींनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ

शपथविधीसाठी नरेंद्र मोदी यांचे नाव पुकारताच टाळ्यांचा गजर

नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात दाखल

अभिनेत्री कंगना रणौत राष्ट्रपती भवनात दाखल

सुषमा स्वराज उपस्थित, पण त्या मंत्रिमंडळात नसणार हे स्पष्ट

उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे राष्ट्रपती भवनात दाखल

ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत सपत्नीक उपस्थित 

रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी सपत्नीक उपस्थित

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग राष्ट्रपती भवनात दाखल

लालकृष्ण अडवाणी राष्ट्रपती भवनात दाखल

विविध क्षेत्रातील मान्यवर राष्ट्रपती भवनात दाखल झाले आहेत

भाजपच्या मित्रपक्षांचे नेते, विविध राज्यांचे मुख्यमंत्रीही शपथविधी सोहळ्यासाठी आले आहेत

अनुराग ठाकूर पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल

माजी परराष्ट्र सचिव एस जयशंकर पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले

उद्योग क्षेत्रातील दिग्गज घराण्याचे प्रमुख प्रतिनिधीही शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार

बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटीही शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार

राष्ट्रपती रामनाथ कोविंद सर्वांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार

नरेंद्र मोदी यांच्यासोबत सुमारे ४० ते ५० जण मंत्रिपदाची शपथ घेणार

शपथविधी सोहळ्यासाठी देश-विदेशातील ८००० निमंत्रित नवी दिल्लीत दाखल

संध्याकाळी सात वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात शपथविधी सोहळा होणार
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:swearing in ceremony of narendra modi government live update know cabinet minister and state minister name