पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शपथविधी सोहळ्यासाठी मजूर, शेतकऱ्यांसह ५० जणांना खास निमंत्रण

अरविंद केजरीवाल

दिल्ली विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल रविवारी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत सहा मंत्री शपथ घेणार आहेत. मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, इम्रान हुसेन, गोपाल राय, राजेंद्र गौतम आणि कैलाश गहलोत हे सहा नेते केजरीवालांसोबत मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 

लासलगाव प्रकरण: पीडितेची प्रकृती गंभीर, उपचारासाठी मुंबईला हलवले

दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी आपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. अरविंद केजरीवालांनी शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले आहे. तसंच, हा शपथविधी सोहळा विशेष असणार आहे कारण केजरीवालांनी या सोहळ्यासाठी मजूर, शेतकरी यांच्यासह ५० लोकांना आमंत्रित केले आहे. 

उद्धव ठाकरेंकडे पॉवर असू शकते, पण.., काँग्रेसची तीव्र प्रतिक्रिया

दिल्लीला पुढे नेण्यासाठी प्रमुख भूमिका असलेल्या सफाई कामगार, मेट्रो चालक, शेतकरी यासह ५० जणांना आपकडून खास निमंत्रण देण्यात आले आहे. हे सर्वजण केजरीवालांसोबत मंचावर उपस्थित राहणार आहेत. केजरीवाल यांच्यासमवेत एकूण ७० जण मंचावर असतील. या शपथविधी सोहळ्यामध्ये एकूण एक लाख लोकं सहभागी होतील, असा दावा आपने केला आहे. 

ठाकरे सरकारच्या कारभाराविरोधात लवकरच भाजपचे आंदोलनः तावडे

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:swearing in arvind kejriwal special invitation to these 50 people including laborers farmers