पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रज्ञा ठाकूर यांच्याबद्दल स्वरा भास्करनं व्यक्त केलं ठाम मत

स्वरा भास्कर आणि साध्वी प्रज्ञा ठाकूर

बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्करने सोमवारी भोपाळमधील एका कार्यक्रमात दहशतवादावर भाष्य करत भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यावर निशाणा साधला.  दहशतवादाला कोणताही धर्म नसतो पण दहशतवादी एखाद्या धर्माचा असू शकतो, असे ती म्हणाली आहे. साध्वी प्रज्ञा ठाकूर स्वत:ला हिंदू मानतात. त्या दहशतवादाच्या आरोपी आहेत. त्यामुळे त्या हिंदू दहशतवादी आरोपी आहेत. असे स्वरा म्हणाली आहे. भोपाळमध्ये काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात भाजपने साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना रिंगणात उतरवले आहे. 

भोपाळमधील कार्यक्रमात तिला हिंदू दहशतवादासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी स्वरा म्हणाली की, दहशतवादी हल्ला कोणीही करु शकते, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध किंवा यदुही कोणत्याही धर्मातील व्यक्ती दहशतवादी कृत्य करु शकतात. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो. पण दहशतवादी व्यक्ती एखाद्या धर्माचा असू शकतो. साध्वी प्रज्ञा स्वत:ला हिंदू मानतात. त्यांच्यावर दहशतवादाचा आरोप आहे. त्यामुळे त्या हिंदू दहशतवादी आरोपी आहेत, असे स्वरा भास्करने म्हटले आहे. तिच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

स्वरा भास्कर नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत असते. ती राजकारणावरही अनेकदा आपले मत व्यक्त करत असते. ती ट्विटरवरही चांगदली सक्रीय आहे. यापूर्वी तिने लोकसभेच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीमधील प्रचारात सुरु असलेल्या हिंदू-मुस्लीम धार्मिक वक्तव्याबद्दल ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली होती.