पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्वामी चिन्मयानंद प्रकरण: पीडित तरुणीने दिला आत्महत्येचा इशारा

स्वामी चिन्मयानंद

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते स्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या तरुणीने आत्महत्येचा इशारा दिला आहे. या तरुणीने सांगितले की, जर चिन्मयानंद यांना अटक नाही झाली तर आत्महत्या करेल. पीडित तरुणीने एसआयटीच्या तपासावर नाराजी व्यक्त करत चिन्मयानंद यांच्याविरोधात कारवाई कधी केली जाणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान, चिन्मयानंद यांना बुधवारी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा

बुधवारी, पीडित तरुणीने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, 'स्वामी चिन्मयानंद यांना अटक न झाल्यास रॉकेल अंगावर ओतून आत्महत्या करेल.' तरुणीच्या या वक्तव्यानंतर एसआयटीने बुधवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. एसआयटीचे आयजी नविन अरोरा यांनी सांगितले की, 'एसआयटी कोणाच्या भावनांनुसार किंवा कोणाच्या अपेक्षेनुसार तपास करणार नाही. तथ्ये आणि विधानांच्या आधारे एसआयटी चौकशी करत आहे. तसंच सर्व बाजूंनी संयम साधण्याची गरज आहे', असे मत त्यांनी व्यक्त केले. 

मुंबई, ठाणे, कोकणात अतिवृष्टीचा इशारा; शाळांना सुट्टी जाहीर
 
'एसआयटीवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. या प्रकरणात एकही तथ्य नाही सुटले पाहिजे याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. दिवस-रात्र एक करुन आम्ही तपास करत आहोत. २३ तारखेला या प्रकरणाचा सद्यस्थिती अहवाल उच्च न्यायालयात सादर केला जाईल, अशी माहिती नविन अरोरा यांनी दिली आहे. दरम्यान, स्वामी चिन्मयानंद यांना बुधवारी संध्याकाळी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

आदित्य ठाकरेंविरोधात सुजात आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात ?